संजय दत्तची मुलगी त्रिशालाच्या हॉट अदांनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, पाहा फोटो


मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या हटके चित्रपटांसाठी आणि अभिनयासाठी ओळखला जातो. याशिवाय संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्याने आपले वैयक्तिक आयुष्य कधीही वैयक्तिक ठेवले नाही, त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दल लोकांना नेहमी माहित होते. अलीकडेच त्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याचे लोक कौतुक करताना थकत नाहीत.

संजय दत्त याला एक मुलगी देखील आहे. त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या हटके अदा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. वेगवेगळे विषय घेत सोशल साईट्सवर अॅक्टिव्ह राहणाऱ्या त्रिशालावर सध्या लाईक्सची बरसात होतेय, ते तिच्या तिच्या नव्या ग्लॅमरस फोटोंमुळे. तिने आपल्या फोटोने चाहत्याना घायाळ केलंय.

त्रिशालाची मनमोहक शैली

संजय दत्तची मुलगी त्रिशालाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. गेल्या काही महीन्यांत केलेल्या डाईटचा परिणाम दिसतोय. तिने बरेच वजन कमी केलं आहे.  त्रिशाला दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. पुन्हा एकदा लोकांना त्रिशालाची स्टाईल आवडली आहे.

Sanjay Dutt Daughter Photo: संजय दत्त की बेटी ने शेयर की ग्लैमरस फोटो, हुस्न की तारीफ करते थक नहीं रहे लोग!

त्रिशला दत्त रोज तिच्या सोशल मीडियावर लोकांशी संवाद सादत असते. अमेरिकेत राहून ती सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. मानसिक आरोग्य आणि रिलेशनशीप या विषयांवर ती अनेकदा मोकळेपणाने बोलत असते. 

चाहत्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत गोष्टी शेअर करुन त्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेत असते. तिने लोकांना सांगितले की, ती एका घातक रिलेशनशीपमध्ये होती. त्यातून तिने स्वत:ला कसं वाचवलं याच उदाहरण ती वेळोवेळी आपल्या चाहत्यांना देत असते. 

त्रिशला दत्त अमेरिकेत राहते आणि तिथे सायकोथेरपिस्ट म्हणून काम करते. संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त अमेरिकेत राहते. ती इथे आजीसोबत राहते. संजय दत्त आपल्या मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला जात असतो.Source link

Leave a Reply