Sangli Police succeeded in foiling the kidnapping attempt of a three-year-old boy



सांगली : सवतीच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून बिहारला पळविण्याचा प्रयत्न उधळून लावत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मुलाची सातारा रेल्वे स्थानकावर सुखरूप सुटका केली. मुलाला पळवून नेणार्‍या पहिल्या पत्नीसह चौघांना गजाआड करण्यात आले.

बिहारमधील शामसुंदर रवीदास यांने पहिली पत्नी बिहारमधील महूयत (ता. धरेया जि. गया) येथे असताना सांगलीतील हॉटेलमध्ये काम करणारी महिला वैशाली हिच्याशी लग्न केले होते. पतीला परत नेण्यासाठी पत्नी रेशमीदेवी, तिचे भाउ बुदन, मिथुनकुमार आणि आई वासितदेवी हे चौघेजण सांगलीत आले होते. गुरूवारी दुसरी पत्नी वैशाली हिच्या सोबत वादावादी झाली.

हेही वाचा : सांगली : …सध्या जोमात नसलो तरी बरं चाललं आहे – शहाजी बापू पाटील यांचं विधान!

या वादावादीची तक्रार देण्यासाठी दुसरी पत्नी वैशाली ही शहर पोलीस ठाण्यात गेली असता पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाचा मुलगा सुजीत याचे अपहरण केले. या प्रकरणी पोलीसांना माहिती देताच निरीक्षक अभिजित देशमुख यांनी तातडीने हालचाली करीत पोलीस पथक संशयितांच्या शोधासाठी पाठविले.

हेही वाचा : सांगली : मिरज तालुक्यातील शिपूरमध्ये उसाच्या फडात आढळली गांजा शेती

संशयित अपहृत मुलासह महाराष्ट्र एयसप्रेसने बिहारला रवाना झाल्याचे समजले. उप अधिक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक विजय सुतार, संदीप पाटील, धनाजी शिंदे, अभिजित माळकर आदींनी कराड व सातारा येथे संशयितांना पकडण्यासाठी मुलाची सुटका करण्यासाठी सापळा लावला. सातारा रेल्वे स्थानकावर संशयितांना सातारा पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. मुलाचीही सुखरूप सुटका करण्यात आली. मुलाला आईच्या हवाली करण्यात आले असल्याची माहिती निरीक्षक देशमुख यांनी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपहरण केल्या प्रकरणी चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply