Headlines

सांगली : खासगी रुग्णालयातून अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण

[ad_1]

सांगलीतील तासगावमध्ये मध्यवस्तीत असणाऱ्या एका खासगी रुग्णालयातून अवघ्या एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी समोर आली. काही दिवसांपुर्वी रुग्णालयात परिचारिका म्हणून रुजू झालेल्या महिलेनेच हा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तवली जात होती, पोलिसांकडूनही या महिलेचा शोध सुरू होता. अखेर संबंधित महिलेला अर्भकासह भवानीनगर किर्लोस्करवाडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाळ सुरक्षित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तासगावमधील सिध्देश्वर चौकामध्ये डॉ. अंजली पाटील यांचे महिलांवरील उपचारासाठी रुग्णालय असून याच ठिकाणी अर्भकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.

बाळाला मोठ्या पर्समध्ये टाकले आणि केले पलायन –

चिंचणी येथील महिला दोन दिवसांपुर्वी बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. काल तिची प्रसुती झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला आपण परिचारिका असल्याचे दर्शवत आणि बाळाची तपासणी करणार असल्याचे भासवून बाळ असलेल्या वार्डमध्ये गेली. त्यानंतर तिने बाळाला घेत आपल्या काखेतील मोठ्या पर्समध्ये टाकले. आणि क्षणार्धात पलायन केले होते.

या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान ही घटना रुग्णालयाबाहेर असलेल्या अन्य दुकानातील कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाली होती. याआधारे पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत होते.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *