sandeep deshpande criticized sanjay raut on rokhthok article in samana spb 94आज ‘सामना’च्या रोखठोक सदरात राज्यपालांवर टीकास्र सोडण्यात आले आहे. मात्र, हे सदर संजय राऊत यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. “भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेल्या संजय राऊत यांना कारागृहातून लेखनाची परवानगी कशी मिळते? ” अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत? असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

“आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्रसेनानी नाहीत, की त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी, की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी

हेही वाचा – “आमदार शिंदे गटातून बाहेर पडणार,” अजित पवारांचा दावा, शहाजीबापू म्हणाले “त्यांना राजकारणापेक्षा भविष्यात…”

यासंदर्भात टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. “संजय राऊत यांना पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून लेख लिहीण्याची परवानगी आहे का? कारण ते काही स्वातंत्र सैनिक नाहीत किंवा त्यांच्या नावाने दुसरं कोणी लेख लिहित आहेत का? कोणी डुप्लीकेट संजय राऊत तयार झाले आहेत का? असे प्रश्न सामान्य जनतेला पडत आहेत. ते प्रश्न आम्ही उपस्थित केले आहेत.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘रोखठोक’मध्ये राज्यपालांवर टीकास्र

दरम्यान, आज सामनाच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांच्या नावाने लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले आहे. “राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.Source link

Leave a Reply