Headlines

Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

[ad_1]

मुंबई : प्रत्येक व्यक्तीची ठेवण ही वेगळी असते. अनेक लोकांच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ (Mole on Body) असतात. लोकांना अनेकदा असं वाटतं की शरीरावर हे तीळ असणं शुभ की अशुभ, परंतु त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. या प्रश्नाचं उत्तर समुद्रशास्त्रात दडलेलं आहे. हा ग्रंथ महर्षि समुद्र नावाच्या ऋषींनी रचला होता असं म्हटलं जातं, म्हणून याला सामुद्रिक शास्त्र (Samudrik Shastra) असे म्हणतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या मोल्सचा अर्थ या पुस्तकात दिला आहे. याबद्दल सविस्तर माहिती द्या.

सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या उजव्या तळहातावर तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते. ज्यांच्या तळहातावर असा तीळ असतो, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि त्यांना पैशांची कमी राहत नाही. संपत्तीसोबतच असे लोक समाजात प्रतिष्ठाही कमावतात. (samudrik shastra meaning of having moles on different parts of the body are blessed with goddess laxmi and lord kuber s wealth) 

 आणखी वाचा : ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण

ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असतो, ते भाग्याचे धनी मानले जातात. असे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. अशा लोकांना सामाजिक कार्यातही रस असतो आणि भरपूर पैसे कमावतात. याउलट ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो, त्यांना प्रवासाची आवड असते. असे लोक मोकळेपणाने खर्च करण्यापासून परावृत्त करत नाहीत आणि अनेक वेळा त्यांना नंतर पश्चाताप होतो.

आणखी वाचा : Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या छातीच्या मध्यभागी तीळ असतो, त्यांच्यावर धनाची देवता कुबेरचा आशीर्वाद नेहमीच असतो. असे लोक सर्जनशील स्वभावाचे असतात. ते काही ना काही करत राहतात, त्यामुळे त्यांची चर्चा समाजात कायमच असते. असे लोक सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त करून समाजात आपली विशेष ओळख निर्माण करतात.

आणखी वाचा : ‘मराठी रॅप सुनने गुज्जू भी …’, तरुणीचा मराठमोळा रॅप सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; एकदा तुम्हीही ऐकाच

ज्यांच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असतो, त्यांच्यावर कुबेर देवतेचा आशीर्वाद सदैव राहतो. अशा लोकांना त्यांच्या मेहनतीनं आणि मृदू स्वभावामुळे समाजात उच्च स्थान प्राप्त मिळवतात. अशा लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही असे सामुद्रिक शास्त्रात म्हटले आहे. दुसरीकडे, कपाळाच्या डाव्या बाजूला तीळ असलेल्या लोकांना आरोग्यापासून ते पैशांपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आणखी वाचा : Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *