समांथानंतर Ex-Husband नागा चैतन्य लावणार ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी?


मुंबई : Naga Chaitanya on Appearing Koffee With Karan 7: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, पण त्यांच्या संबंधित बातम्या रोजच चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच समांथा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचली. तेव्हा समांथानं तिच्या लग्नाविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. तिथे तिनं आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबतच्या घटस्फोटाबद्दल अनेक खुलासे केले. परंतु आता नागा चैतन्यनेही ‘कॉफी विथ करण’मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला होता, जो लोकांना प्रचंड आवडला होता. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान तो करण जोहरच्या शोमध्ये जाण्याबद्दल म्हणाला, ‘मला संधी मिळाली तर का नाही? करण जोहर ग्रेट आहे, मला त्याचं काम आवडतं. त्याला मला शोमध्ये बोलवायचं असेल तर का नाही?’ यासोबतच लोक त्याचे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कसे एकत्र करतात याबद्दलही, नागा चैतन्यनं सांगितले.

या दोन गोष्टी मी वेगळ्या ठेवल्यामुळे कधी कधी खूप त्रास होतो, असे नागा चैतन्य म्हणाला. नागाच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा तुमचं प्रोफेशनल आयुष्य सोडून तुमचे खासगी आयुष्य मीडियामध्ये हेडलाइन बनते, तेव्हा ते थोडे अस्वस्थ आणि निराशाजनक असते.’

घटस्फोटावर काय म्हणाली समांथा?

अलीकडेच, समांथा रुथ प्रभूनं ‘कॉफी विथ करण 7’ च्या 3 एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान ती बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत पोहोचली होती. जेव्हा करणनं समांथाला घटस्फोटाबद्दल विचारले तेव्हा तिनं सांगितले की, ‘हा काळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता, पण मी खूप धाडसी आहे. त्यानंतर खूप त्रास झाला होता पण आता मी आनंदी आहे.’Source link

Leave a Reply