समंथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने धरला ठेका; भन्नाट डान्सचा व्हिडीयो व्हायरल


मुंबई : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसत नाहीये. आयपीलएमध्येही तो गेल्या काही सामन्यांमध्ये प्लॉप झालेला दिसला. यामुळे विराटचे चाहते काही प्रमाणात नाराज आहेत. मात्र विराटच्या डान्समुळे त्याचे चाहते सध्या खूप खूश आहेत. संमथाच्या Oo Antava गाण्यावर विराटने ताल धरला होता.

नुकतंच आरसीबीचा धडाकेजाब फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचं लग्न पार पडलं. ग्लॅन मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहली आणि बंगळुरूची टीम तुफान मजा करताना दिसली. यावेळी Oo Antava गाण्यावर कोहलीने डान्स केला असून या डान्सचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

33 वर्षीय विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलच्या लग्न समारंभात आरसीबी टीममधील खेळाडूंसोबत आनंदात वेळ घालवला. विराट कोहली डान्स करत असताना इतर लोक त्याला चीअर करत होते.

या लग्न समारंभात विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बंगळुरू टीमने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले तर 4 सामने गमवले आहेत. बंगळुरू टीम पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. यंदा बंगळुरू प्लेऑफपर्यंत पोहोचते का? याची उत्सुकता आहेSource link

Leave a Reply