Samantha Ruth Prabhu ने नागा चैतन्यला केलं अनफॉलो, डिलीट केली ‘ती’ पोस्ट


मुंबई : दक्षिण भारतीय सौंदर्यवती समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी ‘ये माया चेसावे’ Ye Maaya Chesave हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. या चित्रपटानंतर दोघेही इंडस्ट्रीतील टॉप-रेटेड प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले. मात्र या सिनेमांसोबतच दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. 

टॉलिवूड इंटस्ट्रीच्या प्रेक्षकांनी या दोघांमधलं प्रेम आणि यांची लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावरच अनुभवली. त्यानंतर हीच खरी प्रेम कहाणी ठरली. दोघांनी लग्न केलं. आपलं नातं एक पाऊल पुढे नेलं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. गेल्यावर्षीच या दोघांनी घटस्फोट घेतला. 

अभिनेत्रीने डिलिट केले फोटो 

सामंथा प्रभू आणि नागा चैतन्याने आपले रस्ते वेगळे निवडले आहेत. तरी देखील चाहत्यांना हे दोघं भविष्यात एकत्र येतील अशी एक आशा होती. पण आता ती आशा देखील धुसर झाली आहे. 

सामंथा रूथ प्रभूने नागा चैतन्याला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तसेच नागासोबतचे फोटो डिलीट केले आहेत. तसेच सामंथाने घटस्फोट किंवा त्यासंबंधातील कोणतीच गोष्ट प्रोफाईल फोटोतून काढली आहे. 

खासगी आयुष्यात सामंथा चर्चेत 

समांथाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सामंथा गुलाबी रंगाच्या शॉर्ट्स आणि टॉपमध्ये एका मोठ्या दगडावर उभी असल्याचं दिसत आहे. तिच्यामागे दिसत असणाऱ्या धबधब्यामुळे तिचा हा फोटो अजूनच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तिच्या फोटोंवरुन नजर हटवणं कठिण होत आहे. 

याचबरोबर फोटोला दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये सामंथाने लिहीलंय की, ”आयुष्यात त्याचा आनंद घ्या किंवा सहन करा, कारण जीवनात चढ-उतार येणारच.” या पोस्टनंतर सांमथाने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. या पोस्टला 17 लाखांपेक्षा व्हूज मिळाले आहेत.

लोकं  तिच्या पर्सनल लाईफशी ही पोस्ट जोडत आहेत. नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यानंतर सामंथाने  ऋषिकेशला जावून आपल्या धार्मिक यात्रेला सुरुवात केली. बऱ्याच प्रसिद्ध आश्रमातही सामंथा यावेळी गेली होती. आपल्या चारधाम यात्रेची झलकही सामंथाने सोशल मीडियावर शेअर केली होती. याचबरोबर आपल्या प्रोफेशनल लाईफमधूनही सामंथा खूप नाव कमवत आहे. Source link

Leave a Reply