Samantha Ruth Prabhu अध्यात्माच्या मार्गावर? म्हणते, ‘आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींचा संबंध…?’


मुंबई : घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ने स्वतःला सावरलं आहे. समंथा आणि नागा चैतन्याच्या (Naga Chaitanya) घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता समंथाने स्वतःला सावरलं आहे. अभिनेत्रीकडे आज अनेक मोठे प्रोजेक्ट आहे. घटस्फोटानंतर कायम चर्चेत असलेली समंथा पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी समंथा आणि सद्गुरुंमध्ये झालेली चर्चा प्रत्येकाच्या आयुष्यासोबत निगडीत आहे. प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या-वाईट गोष्टी (Good and bad things in life) घडत असतात. याबद्दल अभिनेत्रीने सद्गुरूंना (sadhguru) एक प्रश्न विचारला. अभिनेत्रीच्या प्रश्नावर सद्गुरूंनी देखील मोलाचं उत्तर दिलं.

अभिनेत्रीने सद्गुरूंना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ‘आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत, त्याचा आपल्या कर्माशी (karma) सबंध आहे का? आपल्या कर्मांच्या आपल्या जीवनावर परिणाम होतो का? कदाचित आपल्यासाठी अशा गोष्टी नुकसानदायक असतील,  पण त्याचा आपण स्वीकार करायला हवा…’

समंथाच्या प्रश्नावर उत्तर देताना सद्गुरु अभिनेत्रीला विचारतात, ‘जग आजही तुझ्यासोबत तटस्थ आहे, असं तुला वाटतं.’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी हा प्रश्न विचारतेय कारण, माझ्या आयुष्यात जे काही होत आहे, ते माझ्या कर्माचं फळ आहे…’ (karma is everything in life)

समंथाच्या या वक्तव्यावर सद्गुरु म्हणतात, ‘एखाद्या शाळेतल्या विद्यार्थ्यासारखा हा प्रश्न आहे… तुला असं वाटतं जग तुझ्यासोबत तटस्थ आहे, पण आत्तापर्यंत तुला कल्पना आली पाहिजे की जग तटस्थ नाही.’  (law of karma)

समंथा आणि नागा चैतन्यचं घटस्फोट (Divorce of Samantha and Naga Chaitanya)
2021 मध्ये, समंथा रुथ प्रभूने पती आणि अभिनेता नागा चैतन्यपासून वेगळं होण्याची घोषणा केली. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. समंथा आणि नागाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.Source link

Leave a Reply