Samantha Ruth Prabhu: ‘शांकुतलम’ चित्रपटातील ‘मल्लिका-मल्लिका’ गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा


Samantha Ruth Prabhu’s First Look From Shaakuntalam : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)  ही सध्या ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. समांथा सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिलं गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात समांथाचे अनेक वेगवेगळे रुप पाहायला मिळाले आहेत. ‘मल्लिका मल्लिका’ असे या गाण्याचे नाव आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

कालिदास या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या संस्कृत नाटक ‘अभिज्ञान शाकुंतलम’ पर आधारित आहे. या चित्रपटात शकुंतलाच्या भूमिकेत समांथा, महाभारताचा राजा दुष्यंतच्या भूमिकेत देव मोहन दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शकुंतला आणि दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेची झलक पाहायला मिळते. लग्न झाल्यानंतर दुष्यंत शकुंतलाला कसे विसरले हे यात दाखवण्यात आले आहे. 

हेही वाचा : ‘कोख किराए पर ली’; सरोगसीच्या आरोपावर Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य

समांथाच्या या चित्रपटातील ‘मल्लिका मल्लिका’ या गाण्याचं संगीत दिग्दर्शन मणि शर्मा यांनी केले आहे. तर हे गाणं चैतन्य प्रसाद यांनी शब्दबद्ध केलं आहे. या गाण्यात समांथानं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या गाण्यातील एक लूक समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. समांथानं हा लूक शेअर करत सांगितले की ‘मल्लिका फक्त तुमच्यासाठी’. हे गाणं राम्या बेहरानं गायलं आहे. दरम्यान, एका दिवसात हे गाणं 31 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. 

सामंथा रुथ प्रभूच्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटात देव मोहन (Dev Mohan), पुष्पा (Pushpa) फेम अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुलगी अरहा (Allu Arjun’s Daughter Araha), सचिन खेडेकर (Sachin Khedekar), कबीर बेदी (Kabir Bedi) , डॉ एम मोहन बाबू (Dr. M Mohan Babu), प्रकाश राज (Prakash Raj) , मधुबाला (Madhubala), गौतमी (Gautami) , आदिती बालन (Aditi Balan), अनन्या नागल्ला (Ananya Nagalla) आणि जिशू सेनगुप्ता (Jisshu Sengupta) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुनशेखर यांनी केले आहे. दरम्यान, शाकुंतलम या चित्रपटाशिवाय समांथा ही दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘कुशी’ या चित्रपटात दिसणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’ मध्ये दिसणार आहे.Source link

Leave a Reply