Headlines

सलमानसोबत सावलीप्रमाणे वावरणाऱ्या Bodygaurd शेराचा पगार माहितीये?

[ad_1]

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याच्या अवतीभोवती कायमच अनेक चेहरे दिसले. काही चेहरे सातत्यानं त्याला साथ देत आले, तर काहींनी मात्र सलमानपासून ठराविक काळानंतर अंतर ठेवण्यास सुरुवात केली. या साऱ्यामध्ये एका व्यक्तीनं त्याची साथ केव्हाही सोडली नाही. ही व्यक्ती म्हणजे त्याचा बॉडीगार्ड आणि कधीही हाकेला धावून येणारा शेरा. (salman khan shera )

शेरासाठी सलमान हा ‘मालिक’ नसून त्याहूनही खूप काही आहे. शेराच्या कुटुंबीयांसाठीही समान खूप काही करतो. हे नातं रक्ताच्या नात्याहूनही जास्त जवळचं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

शेरा एका शीख कुटुंबातून आला आहे. गुरमीत सिंग जॉली असं त्याचं खरं नाव. असं म्हटलं जातं की एका पार्टीमध्ये शेरा सलमान आणि अरबाजला भेटला. त्याचवेळी सलमान त्याच्यासाठी बॉडीगार्ड शोधत होता.

पहिल्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी अरबाजनं शेराला फोन केला आणि त्याला भेटण्यासाठ बोलवलं आणि त्या क्षणापासून शेरा सलमानच्या सावलीप्रमाणं त्याला साथ देतो.

शेराकडे पाहिल्यास तोसुद्धा कोणा एका अभिनेत्याहून कमी नाही, हे लक्षात येतं. 1987 मिस्टर मुंबई ज्युनिअर जिंकत 1988 मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअरमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

शेराचं सलमानच्या जीवनातील स्थान तुम्हीआम्ही सर्वजण जाणतो. आता त्याच्या पगाराचा आकडा सांगावा तर, तुम्हीही हादराल.

सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शेराचं वार्षिक उत्पन्न जवळपास 2 कोटी रुपये इतकं आहे. बसला ना धक्का?

सलमानचा बॉडीगार्ड होण्याआधी शेरा मायकल जॅक्सन, विल स्मिथ, जॅकी चॅन, पॅरिस हिल्टन अशा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसाठीही संरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *