Headlines

सलमानच्या लग्नाची चर्चा आणि ही ‘खास’ मिठी… काही लक्षात येतंय का?

[ad_1]

मुंबई : अभिनेता सलमान खान याची बहिण अर्पिता खान आणि तिचा पती, आयुष शर्मा यांनी नुकतंच ईदच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनी या पार्टीला हजेरी लावली होती. सलमानच्या मित्रपरिवारातीलही काही खास चेहरे यावेळी त्याला ‘ईद मुबारक’ म्हणण्यासाठी आले होते. (Salman khan eid party)

छायाचित्रकारांनीही यावेळी कलाकारांची एक झलक टीपण्यासाठी गर्दी केली होती. तिथं एक-एकजण या पार्टीमध्ये एंट्री घेत होता आणि इथे सलमान मात्र सर्वांमध्ये एका खास व्यक्तीला वेळ देताना दिसला. 

सलमानचं तिच्याशी कैक वर्षांपासून असणारं नातं यावेळी पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या नात्याच्या आड दरम्यानचा काळही अंतर आणू शकलेला नाही, हेच या क्षणांनी सिद्ध केलं. 

सलमानला घट्ट मिठी मारत त्याच्यासोबतच्या या क्षणांचा आनंद साजरा करणारी ‘ती’ होती, अभिनेत्री करिष्मा कपूर. (Karishma kapoor at salman khans eid party)

90 चं दशक गाजवणारी सलमान आणि करिष्माची जोडी, आजही तितकीच लोकप्रिय आहे, जितकी ती त्यावेळी होती. हीच जोडी जेव्हा पार्टीच्या निमित्तानं एकमेकांसमोर आली, तेव्हा त्यांच्यात असणारी निखळ मैत्री सर्वांचीच मनं जिंकून गेली. 

करिष्मानंही या क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, ‘Back with the OG’ असं लिहिलं. सोबतच तिनं सर्वांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या. इथं या दोघांचं नातं आणि मैत्री पाहताना तिथं नेटकऱ्यांनी, या दोघांनी लग्न करावं असा फुकाचा सल्लाही दिला. 

मागील काही दिवासांपासून करिष्माच्या लग्नाच्या चर्चा सुरु असल्याचं पाहता आता त्यात सलमानच्या पार्टीतील हा फोटो आणखी भर टाकण्याचं काम करत आहे हे खरं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *