सलमान खान सोबतच्या नात्याबाबत कंगना असं का म्हणाली; ‘तो माझा…’


मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (kangana ranaut) चित्रपटातील अभिनयासह आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेचे कंगनाने स्टार किड्स अंड्यासारखे दिसतात, तसेच  बॉलिवूडमध्ये कोणीही नाही ज्याला घरी बोलावता येईल असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर तिने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेय, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. 

असं पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये तिचे क्वचितचं मित्र आहेत. त्यातही ती खुप कमी सेलिब्रिटींच्या पार्ट्यामध्ये जात असते.  कंगनाला बॉलिवूड पार्ट्या टाळताना तुम्ही पाहिलं असेलंच.

मात्र अलीकडेच सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या ईद पार्टीत कंगना दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. सलमानच्या ईद पार्टीत कंगनाला (kangana ranaut)पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यामागचे कारण आता कंगणाने सांगितलेय.  

सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने सलमान खानच्या (Salman Khan) ईद पार्टी जाण्यामागचं कारण आणि सलमानच्या सोबतच्या मैत्रीबाबतचा खुलासा केला. कंगनाने म्हटले की, मी पार्ट्यांमध्ये जात नाही, असे नाही. मला पाहिजे तिथे मी जाते.

सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. त्यांनी मला फोन करून पार्टीला बोलावल्यावर मी तिथे गेले.  

‘धाकड’चा ट्रेलर शेअर

या पार्टीनंतर सलमानने कंगनाच्या (kangana ranaut) ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला होता. त्यामुळे कंगना खूपच खुश होती. सलमानचे आभार व्यक्त करताना कंगना म्हणाली होती की,

आतापासून ती इंडस्ट्रीत एकटी आहे असे ती कधीच म्हणणार नाही. या तिच्या वक्तव्याने सलमान आणि कंगनाची मैत्री घट्ट असल्याचे दिसून आले होते. कंगना आणि सलमानच्या या मैत्रीने अनेकांना धक्का बसलाय. Source link

Leave a Reply