सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, भेटीचे खरं कारण आले समोर…


मुंबई : Actor Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना दिसत आहे. त्याने ही भेट का घेतली याचीच जोरदार चर्चा आहे. त्याच्या या भेटी मागचे खरं कारण समोर आलं आहे.

दबंग सलमान खान याने पिस्तूल परवान्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्याचे सांगण्यात येत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमानला स्वसंरक्षणासाठी पिस्तूल हवे, असल्याची माहिती आहे. त्यासाठीच त्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली.

सलमान खान याने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांने पोलीस आयुक्तांकडे शस्त्र स्वत:कडे बाळगण्याची परवानगी मागितली आणि त्यासाठीचा अर्जही केला. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणे जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच सलमान खान याने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

सलमानचा हा व्हिडिओ समोर आला

सलमान खान मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत सलमान खान याने शस्त्र स्वत:कडे बाळगण्याबाबत परवानगी मागितली.

सल्लूला जीवे मारण्याच्या धमक्या

काही दिवसांपूर्वी गायक मुसवालाप्रमाणेच सलमान खान याचे वडील सलीम खान यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यानंतर सलमान खान याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक सलमान खान याच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करत आहेत. मात्र, तो कोणाशी बोलला नाही. काहीच उत्तर न देता तो सरळ त्याच्या गाडीत बसला. व्हिडिओमध्ये सलमान खान लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे.Source link

Leave a Reply