सलमानने ऐश्वर्याच्या जागी ‘ज्या’ अभिनेत्रीला संधी दिली, ती सध्या काय करते?


मुंबई : अभिनेता सलमान खानने जिला बॉलिवूडमध्ये आणलं ती एका कारणामुळे चर्चेत आली. त्यामगे देखील एक कारण होतं. ते कारण म्हणहे ती हुबेहूब अभिनेत्री ऐश्वर्या सारखी दिसत होती. पण फार काळ ती बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल . स्नेहा उल्लालने ‘लकी: नो टाइम फॉर लव’ चित्रपटाच्या  माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने तेव्हा स्नेहा तुफान चर्चेत आली, पण फार काळ काही तिची जादू चालू शकली नाही. 

स्नेहा उल्लालचा जन्म ओमानची राजधानी मस्कत येथे झाला,  त्याचं ठिकाणी स्नेहाने सुरुवातीचे शिक्षणही केलं. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नेहाच्या कुटुंबीयांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. 

Sneha Ullal Photos

स्नेहा मुंबईत पुढील शिक्षण घेऊन कामाच्या शोधात लागली. तिला अभिनय करायचा होता आणि योगायोगाने तिची भेट सलमान खानशी झाली. तेव्हा सलमान आणि अभिनेत्री ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं. 

त्यामुळे सर्व काही विसरून सलमान बॉलीवूडमध्ये परतण्याचा मार्ग शोधत होता. याच वेळी एका कार्यक्रमात सलमान खान आणि स्नेहा उल्लाल यांची भेट झाली.  

Salman Khan Sneha Ullah

त्यानंतर सलमानने स्नेहाला  चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. पहिल्याचं चित्रपटातून स्नेहाला प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळालं. पण ते काही जास्त टिकू शकलं नाही. 

जून 2017 मध्ये स्नेहाने एका मुलाखतीत सांगितले की, तिला कामातून ब्रेक का घ्यावा लागला. कारण ती तीन वर्षांपासून ऑटोइम्यून डिसऑर्डर नावाच्या आजाराने ग्रस्त होती. या आजारात रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते. म्हणून ती काही महिने बॉलिवूडपासून दूर होती. 

Sneha Ullah Break

त्यानंतर स्नेहाने तिचा मोर्चा साऊथ कलाविश्वाच्या दिशेने वळवला. जिथे तिने ‘उल्लासमगा उत्साहाम्गा’, ‘किंग’, ‘सिम्हा’, ‘बेजुबान इश्क’ आणि ‘मोस्ट वेलकम’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले पण नंतर स्नेहा गायब झाली.

अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, स्नेहा ग्लॅमरपासून दूर राहून फक्त सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, स्नेहा उत्तम संधीच्या देखील शोधात आहे. 

 Source link

Leave a Reply