Headlines

रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी ‘या’ लेकिला स्वत:चं नाव दिलं

[ad_1]

Salim Khan Birthday : दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अशी ख्याती असणाऱ्या आणि हिंदी कलाजगतामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सलीम खान यांचा आज वाढदिवस (Salim Khan Birthday ). बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि खान कुटुंबाचे प्रमुख अशीही त्यांची ओळख. कलाकारांच्या या कुटुंबामध्ये सलीम त्यांनी स्वत:चं वेगळेपण जपत जीवन जगण्याच्या सिद्धांतांनी सर्वांची मनंही जिंकली. सर्व मुलांसोबतच सलीम यांचा त्यांच्या लेकिवर म्हणजेच अर्पितावर विशेष जीव. 

कोट्वधींची मालकीण… 

सलीम खान यांची लेक, अर्पिता (Arpita khan sharma) ही सध्या कोट्यवधींची मालकीण आहे. हल्लीच तिनं मुंबईत एक घरही खरेदी केलं (Arpita khan home), ज्याची किंमत तब्बल 11 कोटी रुपये इतकी होती. तुम्हाला माहितीये का? अर्पिता ही सलीम खान यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. 1981 मध्ये त्यांनी तिला दत्तक घेतलं होतं. 

पत्नीसोबत फिरण्यासाठी गेलं असता रस्स्त्यावर भेटली ‘ती’

रोज सकाळच्या वेळी पत्नीसोबत चालायला जाण्याची सवय सलीम यांना होती. एके दिवशी ते जेव्हा फिरून माघारी येत होते तेव्हाच रस्त्याच्या कडेला त्यांना एका मृत महिलेच्या शेजारी लहान मुलगी रडताना दिसली. त्या मुलीला पाहून सलीम यांच्या काळजाचं पाणी झालं आणि ते तिला आपल्या घरी घेऊन आले. पत्नी हेलन (Helan Salim khan) आणि सलीम यांनी पुढे त्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. 

कोणी ठेवलं तिचं नाव? 

त्या दिवसांमध्ये सलीम खान यांच्यासोबत इंदुरच्या होळकर महाविद्यालयातील त्यांचे मित्र शरद जोशीसुद्धा तिथे होते. ज्यावेळी सलीम यांनी शरद जोशी यांनाच मुलीचं नाव ठेवण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी ही मुलगी तुम्हाला अर्पित झाली आहे त्यामुळं तिचं नाव ‘अर्पिता’ असायला हवं असा विचार मांडला. 

5 भावंडांमध्ये अर्पिता सर्वात धाकटी 

सलीम खान यांच्या मुलांमध्ये अर्पिता सर्वात धाकटी असल्यामुळं ती सर्वांचीच लाडकी. सलमान (Salman khan), अरबाज (Arbaz khan) आणि सोहेल (Sohail khan) या तिन्ही भावांचा तिच्यावर जीव. अर्पितानं लंडनच्या कॉलेज ऑफ फॅशन मार्केटिंग अॅण्ड मॅनेजमेंटचं पदवी शिक्षण घेतलं. काही वर्षांपूर्वीच तिनं आयुष शर्मा याच्याशी लग्न करत संसार थाटला. 

सलीम खान यांनी ज्या मुलीला आसरा दिला आज तिच मुलगी त्यांचं नाव उंचावत असून, कुटुंबाचा आधारही होताना दिसते. कौतुकास्पद नाही का?



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *