साखरपुड्यानंतर विवाहसोहळ्याची लगबग असतानाच अभिनेत्रीला धक्का, लग्न मोडलं आणि….


मुंबई : कोणत्याही मुलीसाठी ठरलेलं लग्न मोडणं हा मोठा धक्का असतो. पाहिलेली असंख्य स्वप्न, आशा- आकांक्षा आणि सर्वकाही उध्वस्त झाल्याचीच भावना अशा प्रसंगी मनात घर करते. सर्वकाही संपल्याची जाणीव होते. कुठंही आशेचा किरण दिसत नाही. एका अघाडीच्या टेलिव्हिज अभिनेत्रीसोबत असंच घडलं होतं. 

साखरपुड्यानंतर लग्नासाठी काही दिवस उरलेले असतानाच तिचं लग्न तुटलं आणि अनेकांनाच हादरा बसला. ही अभिनेत्री आहे, ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabhiji Ghar Par Hain) फेम शिल्पा शिंदे. 

शिल्पानं हल्लीच्याच एका मुलाखतीत यासंबंधीचा खुलासा केला. जिथं तिनं खासगी आयुष्यातील काही प्रसंगांवरही भाष्य केलं. 2009 चा एक काळ होता जेव्हा सर्वांच्याच तोंडी शिल्पा आणि रोमितच्या नात्याची चर्चा होती. 

कुटुंबीयांनीही या नात्याला मान्यता दिली. मोठ्यांच्या सांगण्यावरून या जोडीनं साखरपुडाही केला. लग्नाची तारीखही जवळ आली, पण शिल्पानंच हे नातं तोडलं. 

Shilpa Shinde Love Life: रोमित से सगाई टूटने के बाद शिल्पा को फिर हो गया था प्यार, सालों बाद लव लाइफ पर खुलकर बोलीं

कुटुंबीयांनी समजावूनही तिनं हा निर्णय बदलला नाही. हे नातं अस्तित्वात होतं तेव्हा आपण फारच लहान असल्याचं शिल्पानं सांगितलं. ती वेळ अशी होती जेव्हा शिल्पा या नात्यासाठी, नव्या जबाबदारीसाठी तयार नव्हती. 

कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी वेळ देण्यासाठी म्हणून शिल्पानं रोमितसोबतचं हे नातं तोडलं. दरम्यान, रोमितशी दुरावा पत्करल्यानंतरही ती पुन्हा एकदा एका व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. पण, मुलाखतीत मात्र तिनं या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केला नाही. हे नातं फार काळ टिकलं नाही, अखेर शिल्पानं एकटं राहतच कारकिर्दीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. Source link

Leave a Reply