Headlines

सकाळी उठल्यावर ‘या’ 7 गोष्टी केल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात

[ad_1]

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि संपत्तीने भरभरून राहावे म्हणून ती व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते. पूजा आणि इतर अनेक उपाय करते. जेणेकरून माँ लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहिल. पण तरीही अनेक वेळा नशिबाच्या कमतरतेमुळे माणसाला फारसे यश मिळत नाही. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रात काही सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी घरात वास करेल आणि लोकांचं नशीब बदलेल.

सकाळी उठल्याबरोबर या 7 गोष्टी करा

डोळे उघडताच, व्यक्तीने प्रथम त्याच्या तळहाताकडे पाहिले पाहिजे. तळवे पाहतां भगवंताचें स्मरण करावे, तसेच कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले स्थ‍ितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।। हा मंत्रोच्चारण करा आणि तळवे चेहऱ्यावर फिरवा.

असे मानले जाते की ब्रह्म, सरस्वती यांच्यासोबत लक्ष्मीचा वास व्यक्तीच्या हातात असतो. सकाळी तळवे पाहिल्यास व्यक्तीचा दिवस चांगला जातो आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहाते.

सकाळी उठल्यानंतर पृथ्वीवर पाऊल ठेवण्यापूर्वी किंवा जमीनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी मातेला स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा.

धार्मिक ग्रंथानुसार सूर्योदयापूर्वी उठणे शुभ मानले जाते. तसेच स्नान वगैरे झाल्यावर तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला जल अर्पण करावे. भगवान सूर्यदेव हे मान-सन्मान, नोकरी, व्यवसाय इत्यादींचे कारक ग्रह मानले जातात. त्यामुळे सूर्यदेवाला नियमितपणे अर्घ्य अर्पण केल्याने राशीतील सूर्य ग्रह बलवान होतो आणि प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

शास्त्रातही तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने करावी. तसेच प्रत्येक कामात सिद्धीसाठी तुळशीचा मातीचा तिलक नियमित लावावा.

असे मानले जाते की, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्राचा नियमित पाठ करा. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. आणि घरात पैसे आणि अन्नाची कमतरता राहात नाही.

शिवपुराणात असे सांगितले आहे की, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला उसाच्या रसाने शिवाला अभिषेक केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. त्या व्यक्तीवर भगवान शंकराची कृपा राहते आणि जीवनात सुख-समृद्धी नांदते.

शिवलिंगाचा जलाभिषेक किंवा दुधाचा नियमित अभिषेक केल्यास फायदा होतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *