Headlines

“सकाळी नऊ वाजता बांग देणाराही आता…” राधाकृष्ण विखे पाटलांचं संजय राऊतांवर टीकास्र! | radhakrishna vikhe patil on sanjay raut in solapur rno news rmm 97



भारतीय जनता पार्टीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची अलीकडेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच विखे पाटलांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान, सोलापुरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडीकडून वसुलीचा कार्यक्रम सुरू होता. संबंधित सरकार महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली सरकार होतं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना देण्यात आलेल्या जामिनाबाबत विचारलं असता, विखे पाटलांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह नवाब मलिक आणि संजय राऊतांवर नाव न घेता टीकास्र सोडलं आहे.

हेही वाचा- दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून खास भेट; रेशकार्डधारकांना १०० रुपयांत मिळणार सणाच्या…

अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना रोज एक मंत्री तुरुंगात गेल्याची बातमी समोर यायची. आज एक मंत्री तुरुंगात गेला, उद्या दुसऱ्या मंत्र्यांच्या नातेवाईकाचा अतिरेक्यांशी संबंध आला म्हणून तोही तुरुंगात आणि तिसरा सकाळी ९ वाजता बांग द्यायचा तोही तुरुंगात गेला आहे. अजून किती लोकं तुरुंगात जातील? हेही माहीत नाही. महाराष्ट्रच्या राजकारणात नेमकं काय चालू होतं? असा सवालही विखे पाटलांनी विचारला आहे.



Source link

Leave a Reply