Headlines

सहज आधारशी लिंक करता येईल तुमचा मोबाइल नंबर, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या सोपी प्रोसेस


नवी दिल्ली : आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून या कागदपत्राचा वापर करता येतो. तसेच, बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जर तुमचा जुना मोबाइल नंबर बदलला असेल अथवा नंबर बंद झाला असल्यास, नवीन मोबाइल नंबर Aadhaar Card शी लिंक करणे गरजेचे आहे. Aadhaar Card ची गरज आज प्रत्येक सरकारी कामासाठी पडते.

वाचा: Apple ने भारतात बंद केला आपला सर्वात स्वस्त iPhone, तरीही खरेदी करणे शक्य, जाणून घ्या कसे?

UIDAI ने ट्विट करत माहिती दिली आहे की, Aadhaar Card शी मोबाइल नंबर रजिस्टर करणाऱ्या नागरिकांना अनेक सरकारी व खासगी सेवांचा लाभ घेता येईल. याशिवाय, घरबसल्या आधार ओटीपीद्वारे इनकम टॅक्स रिटर्नला ई-व्हेरिफाय करणे देखील शक्य आहे. एवढेच नाही तर EPF Account मधून पैसे काढण्यासाठी देखील आधार ओटीपीची (Aadhaar OTP) गरज भासते. त्यामुळे आधार – मोबाइल नंबर त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक नसल्यास तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस पूर्ण करू शकता. आधार-मोबाइल नंबर लिंक कसा करायचा, याविषयी जाणून घेऊया.

आधार – मोबाइल नंबर असा करा लिंक (Link Aadhaar with Mobile Number)

  • UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, Aadhaar – Mobile Number लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. यासाठी तुम्हाला https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx या लिंकला भेट द्यावे लागेल. या वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही जवळील आधार सेवा केंद्रीवरील अप्वाइंटमेंट बुक करू शकता.
  • तुम्ही तुमच्या सोयीनुसार तारीख व वेळ निवडू शकता.
  • सुरक्षेच्या कारणामुळे मोबाइल नंबर अपडेट करण्याची सुविधा सध्या ऑनलाइन उपलब्ध नाही. यासाठी तुमच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची गरज पडते. नवीन मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची गरज असल्याने हे ऑनलाइन करणे शक्य नाही. तुम्ही जवळील आधार केंद्राच्या माहितीसाठी https://appointments.uidai.gov.in/EACenter.aspx लिंकला भेट देऊ शकता. तसेच, UIDAI च्या वेबसाइटवर देखील संपूर्ण माहिती मिळेल.
  • तुम्हाला तुमचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागेल. एका ठराविक प्रक्रियेनंतर आधार अपडेट केले जाते. या प्रक्रियेसाठी ५ ते ९० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच, तुम्ही अप्याइंटमेंट घेवून आधार सेवा केंद्रावर गेल्यास अवघ्या काही मिनिटात प्रोसेस पूर्ण होईल.

वाचा: Airtel चे ३४ कोटी ग्राहकांना मोठे गिफ्ट, मोबाइल रिचार्ज आणि बिलावर २५% सूट; पाहा डिटेल्स

वाचा: Tata Play ग्राहकांना चक्क मोफत देत आहे १,१५० रुपयांचा हाय-स्पीड इंटरनेट प्लान, जाणून घ्या कसा घेता येईल फायदा?

वाचा: प्रतिक्षा संपली! दमदार फीचर्ससह सर्वात स्वस्त 5G iPhone अखेर लाँच, जाणून घ्या भारतातील किंमत

Source link

Leave a Reply