Headlines

सगळं सुरळीत सुरू असताना Kapil Sharma च्या वैवाहिक आयुष्यात वादळ?

[ad_1]

Kapil Sharma Show: कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी नेहमीच एकत्र पाहायला मिळतात. त्यांची बॉण्डिंग आणि मैत्री सर्वांनाच फार आवडते. कपिल शर्मा आणि तिच्या पत्नी नेहमीच एकमेकांबद्दल कौतुक करतानाही दिसतात. परंतु कपिल आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हे जाणून निश्चितच आश्चर्याचा धक्का बसला असेल. परंतु काळजी करू नका ही गोष्ट कपिल शर्माच्या खऱ्या आयुष्याबद्दल चाललेली नाहीये. तर कपिल शर्मा शोमध्ये जे नवीन पाहूणे आले आहेत त्यापैंकी एक कपिलची गर्लफ्रेंड आहे तर दुसरी कपिलची पत्नी आहे. या दोघी अभिनेत्री कपिलच्या पत्नी आणि प्रेयसीची भुमिका निभावत आहेत. (kapil sharma stuck between the wife and girlfriend on karwa chauth Know the whole matter)

नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमध्ये कपिल शर्माच्या (Kapil Sharma Wife and Girlfriend) याच दोन पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतं आहे. नक्की हा वाद कशामुळे झाला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का तर हा वाद करवा चौथवरून (Karwa Chauth 2022) झाला आहे. नक्की हा वाद काय झाला यामागची गंमत तुम्हाला जाणून घ्यायचीये? 

हेही वाचा – ऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास

या व्हिडीओत कपिल शर्माची रील वाईफ बिंदू शर्मा (सुमोना चक्रवर्ती) (Sumano Chakrabarty) आणि कपिलची शेजारीण गजल (सृष्टी रोडे) (Srishty Rode)या दोघींनी कपिल शर्मासाठी करवा चौथचा उपवास ठेवला आहे. आणि त्यावरून त्या दोघींमध्ये जोरदार भांडणं सुरू झालं आहे. 

हेही वाचा – ‘मी सुंदर नाही पण…’ बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य

प्रोमोमध्ये सुमोना चक्रवर्ती आणि सृष्टी रोडे पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघींनीही हातात कपिल शर्माला ओवळ्यासाठी दिवा आणि ताट हातात घेतलं आहे. त्याच्या मनात काय चालले आहे ते प्रोमोमध्ये दाखवले आहे. सुमोना म्हणजेच बिंदू शर्मा मनातल्या मनात बोलतात, ‘करवा चौथचा उपवास तू कोणासाठी ठेवला आहेस?’ दुसरीकडे, सृष्टी रोडे मनातल्या मनात उत्तर देते, ‘मी माझ्या कप्पूसाठी उपवास ठेवला आहे. त्यानंतर सुमोना आणि सृष्टीमध्ये भांडण होते. एक म्हणते कप्पू माझा नवरा आहे तर दुसरी म्हणते कप्पू माझे प्रेम आहे. मग सुमोना म्हणजेच बिंदू पुढे म्हणते, असं असेल तर प्रयत्न करून बघ, मी तुला कप्पूचा ‘पू’ही घेऊ देणार नाही. सृष्टी म्हणजेच गझल उत्तर देते, मला कप्पू पूर्ण हवा आहे.

हेही वाचा – करीना, कतरिनानंतर आता ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल

तितक्याच कपिल शर्मा आत येतो आणि दोघांनी म्हणतो, मलाही कोणीतरी विचारा. तेवढ्यात सगळे हसतात. या व्हिडिओवर (Video)आश्चर्यकारक प्रतिक्रिया येत आहेत. खुद्द सुमोनानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्याने कपिल शर्माला सल्ला दिला की त्याने तिघींसाठी सुमोनो, सृष्टी आणि रीयल लाईफ पत्नी गिन्नी चतरथसाठी करवा चौथचा उपवास करावा. सुमोनाच्या या कमेंटवर चाहत्यांना हसू आवरता आले नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *