साधा वाटत असला तरी हा फोटो साधा नाही, यामध्ये लपलेयत चार अंक… पाहा तुम्हाला ते दिसतायत का?


मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला असे फोटो किंवा व्हिडीओ नेहमी पाहायला मिळतात, जे आपल्या मेंदूला आणि नजरेला विचार करायला भाग पाडतात. खरेतर हे फोटो ऑप्टीकल इल्यूजनशी संबंधीत असतात. जे आपल्या नजरेला धोका देतात. लोकांना देखील अशी कोडी सोडवायला फार आवडते, ज्यामुळे अशा पद्धतीचे फोटो हे सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत.

सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. जो खूपच साधा आहे. हा संपूर्ण फोटो फक्त लाल रंगच दिसत आहे. ज्यामध्ये धान्य किंवा फुलं असल्यासारखं दिसत आहे. याशिवाय त्यामध्ये काही अंक लपले आहेत. जे तुमच्या नजरेला धोका देत आहेत.

चित्रात लपलेले अंक शोधा आणि सांगा

सोशल मीडिया वापरकर्ते या फोटोत लपलेले अंक शोधणाऱ्यांना प्रतिभावान अशी उपाधी देत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या प्रश्वाचे उत्तर दिलात, तर तुम्ही ही प्रतिभावान आणि सर्वात बुद्धीमान आहात म्हणून समजा.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 99 टक्के लोकांना या फोटोमध्ये लपलेला आकडा दिसत नाही आहे. जेव्हा तुम्ही लाल रंगाच्याया फोटोकडे पाहाल, तेव्हा ते तुम्हाला सामान्य फोटो सारखे वाटेल. ज्यामध्ये तुम्हाला धान्य किंवा फुलं असल्यासारखं वाटेल. परंतु त्यामध्ये लपलेय चार अंक.

काय आहेत हे अंक?

जर तुम्हाला अंक सापडत नसेल, तर आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. चित्रात लिहिलेले आकडे पाहण्यासाठी तुम्ही स्क्रीन डोळ्यांपासून थोडी लांब करा. आता तुमच्या समोर संख्यांचा आकार दिसेल. त्यानंतर तुमचे डोळे छोटे करा तुम्हाला अंक दिसतील.

तुम्हाला अजूनही हे अंक दिसले नसतील तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यामध्ये 3,3,1 आणि 3 हे चार अंक लपलेले आहेत.  जर तुम्हाला हे आकडे सापडले असतील तर तुमची दृष्टी गरुडापेक्षा तीक्ष्ण आहे.Source link

Leave a Reply