‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर


मुंबई : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक रहस्य आहेत, जे अनेक वर्षांनंतर समोर येतात. कधी सेलिब्रिटींचे रिलेशनशिप, तर कधी ‘वन नाइट स्टँड’ बद्दल अनेक गोष्टी झगमगत्या विश्वात चर्चेत असतात. आता देखील ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) बद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे. कुब्राने ‘ओपन बुक: नॉट क्वाइट ए मेमॉयर’ (Open Book: Not Quite a Memoir) पुस्तकाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

कुब्राने पुस्तकात ‘वन नाईट स्टँड’ आणि प्रेग्नेंसीबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या पुस्तकात खुलासा केला आहे की, तिने एकदा ‘वन नाईट स्टँड’ केलं आणि त्यानंतर ती गरोदर राहिली. त्यावेळी ती फक्त 30 वर्षांची होती.

एका मुलाखतीत कुब्रा सैतला एक प्रश्न विचारण्यात आला,  जेव्हा तिची प्रेग्नेंसी टेस्ट पॉजिटिव्ह आली तेव्हा तिने मोठ्या संकटाचा सामना कसा केला? यावर कुब्रा म्हणाली, “एक आठवड्यानंतर मी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. कारण मी बाळासाठी तयार नव्हती.

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझ्या भविष्यासाठी मी ज्या प्रकारे कल्पना केली होती तशी ती घटना नव्हती. वयाच्या 23 व्या वर्षी लग्न करण्याचा आणि 30 व्या वर्षी मूल जन्माला घालणे, हे मला महिलांवर दबाव असल्यासारखं वाटतं. 

‘गर्भपातानंतर मला एका भयानक व्यक्ती असल्यासारख वाटत होतं. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याची मला अधिक भीती होती. एक अशी वेळ येते जेव्हा आपण स्वतःची मदत करू शकत नाही…’ असं देखील कुब्रा म्हणाली. Source link

Leave a Reply