Ruturaj Gaikwad Record : ऋतुराज गायकवाडचा ‘भीम पराक्रम’! ‘हे’ पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक


Ruturaj Gaikwad Record : टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीत वादळी खेळी करून अनेकांना आश्चर्यचकीत केले आहे. ऋतुराजने उत्तर प्रदेशविरूद्ध द्विशतक ठोकले आहे. हे द्विशतक ठोकून त्याने पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : टीम इंडियाला मिळाला नवीन सिक्सरकिंग,Vijay Hazare Trophy त व्रिक्रम 

ऋतुराजने मोडलेले पाच रेकॉर्ड 

 एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर 

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला जे जमलं नाहीए आहे, ते ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Record) करून दाखवल आहे. ऋतुराजने एका ओव्हमध्ये 7 सिक्स मारले आहेत. याआधी युवराज सिंह, किरॉन पोलार्ड आणि हर्शल गिब्स यांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले होते. मात्र ऋतुराज हा पहिला बॅटसमन ठरलाय ज्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. 

तसेच शिवा सिंह (Shiva Singh) हा लिस्ट-ए क्रिकेटममध्ये पहिला असा बॉलर ठरलाय, ज्याला एका खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारले गेले आहेत. 

हे ही वाचा : Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर, पाहा VIDEO

महाराष्ट्राचा पहिला खेळाडू

उत्तरप्रदेशविरूद्घ (Uttar pradesh) ऋतुराजने (Ruturaj Gaikwad Record) द्विशतक ठोकले आहे. त्यामुळे लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा ऋतुराज हा अकरावा भारतीय बॅटसमन ठरलाय. तर महाराष्ट्र संघातून खेळताना असा पराक्रम करणारा तो पहिला बॅटसमन ठरला आहे. 

दरम्यान याआधी अंकित बावणेच्या नावावर लिस्ट-ए सामन्यांमध्ये महाराष्ट्राकडून सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम होता. अंकितने गेल्या आठवड्यात रांचीमध्ये पुद्दुचेरीविरुद्ध 143 बॉलमध्ये 184 धावा केल्या होत्या. मात्र ऋतुराजच्या 220 धावांच्या द्विशतकीय खेळीमुळे त्याने अंकितचा विक्रम मोडलाय.
 

एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स 

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 7 सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमासह एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad Record) मोडलाय. शिवा सिंहच्या (Shiva Singh) 49व्या ओव्हरमध्ये गायकवाडने 42 धावा केल्या होत्या. या आतापर्यंतच्या एका ओव्हरमधील सर्वाधिक धावा आहेत. या आधी एका ओव्हरमध्ये 36 ही सर्वाधिक धावसंख्या होती. 

 

टीमच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा

चेन्नई येथे (Vijay Hazare trophy) विजय हजारे ट्रॉफी 2009-10 मधील सामन्यात हैदराबादच्या डी रवी तेजाने टाकलेल्या एका ओव्हरमध्ये केरळने 35 धावा केल्या होत्या. एका ओव्हरमध्ये संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. हा विक्रम केरळने जवळपास दशकभर आपल्या नावावर केला होता, मात्र आता महाराष्ट्राच्या नावावर आहे. महाराष्ट्राने शिवा सिंहने (Shiva Singh) टाकलेल्या 6 बॉलमध्ये 43 धावा केल्या आहेत. ऋतुराजचे 7 सिक्स आणि एक नो बॉल अशा 43 धावा काढल्या होत्या. 

सर्वाधिक सिक्सचा विक्रम

विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare trophy) एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम आता ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नावावर आहे. त्याने एका मॅचमध्ये 16 सिक्स ठोकले आहेत. दरम्यान 2013 मध्ये ऑस्ट्रेलियावर 209 धावांनी विजय मिळवताना भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही 16 सिक्सर मारले होते. लिस्ट-ए सामन्यात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम शर्मा आणि गायकवाड यांच्या नावावर आहे.

दरम्यान ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आजच्या सामन्यात वादळी खेळी करून 5 मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. तसेच ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या होत्या. या धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या उत्तर प्रदेश संघ 272 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यामुळे महाराष्ट्राने (Maharashtra) हा सामना 58 धावांनी जिंकला आहे.
 Source link

Leave a Reply