Headlines

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर, पाहा VIDEO

[ad_1]

Ruturaj Gaikwad World Record : चेन्नई सुपर किग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा विश्वासू शिलेदार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकले आहे. विजयी हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळीची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.  

वनडेत ठोकलं द्विशतक

विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022)  दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच वादळ पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या रंगलेल्या सामन्यात गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले आहेत. गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले आहेत. त्याच्या या खेळीने त्याने सिलेक्टर्सचे लक्ष पुन्हा वेधले आहे. 

 एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ही किमया करून दाखवली आहे. ऋतुराजने बॉलर शिवसिंगविरुद्ध ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. त्यानंतर पाचवा बॉल नो बॉल ठरला होता, त्या बॉलवर देखील त्याने सिक्स मारला होता. त्यानंतर पुढील दोन बॉलवर देखील त्याने सिक्स ठोकले आहेत.

आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकल्याची खेळाडूंची कामगिरी ऐकली असेल,पण प्रथमच एका खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहे. त्याची ही खेळी पाहुन क्रिकेट वर्तुळ अचंबित झाले आहे.

एका ओव्हरमध्ये 43 धावा

या सामन्याच्या 49व्या ओव्हरमध्ये गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) 43 धावा ठोकत खळबळ उडवून दिली. गायकवाड यांच्या या स्फोटक खेळीची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. 

49व्या ओव्हरमध्ये ४३ धावा

पहिला चेंडू – सिक्स
दुसरा चेंडू – सिक्स
तिसरा चेंडू – सिक्स
चौथा चेंडू – सिक्स
पाचवा चेंडू नो बॉल – सिक्स
पाचवा चेंडू -सिक्स
सहावा चेंडू – सिक्स

ऋतुराज गायकवाडची कामगिरी

विजय हजारे ट्रॉफी 2022  (Vijay Hazare Trophy 2022) मध्ये गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) आपल्या तुफान फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. या मोसमात त्याने 8 डावात 5 शतके आणि एक द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. विशेषत: उपांत्यपूर्व फेरीतील गायकवाडच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली.

दरम्यान या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 षटकांत 5 बाद 330 धावा केल्या. आता उत्तरप्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान असणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *