सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यूवाई : जागतिक विक्रम नोंदवलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये देशभरातून तब्बल सात हजार पाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो खेळाडू म्हणून परिचित होता.

साताऱ्यात आज पहाटे मोठ्या उत्साहात २१.१ किमी यवतेश्वर कास घाटातील मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ध्वज फडकावून स्पर्धेचे उदघाटन केले.स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातारकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबादच्या प्रल्हाद घनवट यांनी एक तास नऊ मिनिटात तर म्हसवडच्या रेश्मा केवटे यांनी एक तास चोवीस मिनिटात स्पर्धा पूर्ण करून मागील विक्रम मोडले.मांढरदेवचा कालिदास हिरवे याने एक तास बारा मिनिटात स्पर्धा पूर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. तिसरा क्रमांक पटकवलेल्या कोल्हापूरच्या परशुराम भोई यांनी एक तास सतरा मिनिटात स्पर्धा पूर्ण केली.तर नैनिताल येथील मनीषा जोशी यांनी एक तास चव्वेचाळीस मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तांडव हे ढोल पथक कार्यरत होते.

हेही वाचा : “…ही तर भारतीय जनता लाँड्री” भ्रष्टाचारावरुन सुप्रिया सुळेंची खोचक टीका, म्हणाल्या, “भाजपात आल्यावर नेत्यांना…”

यंदा मोठ्या उत्साहात मॅरेथॉन पार पडली. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तैनात होत्या. मॅरेथॉन सुरू होऊन एक तासही पार पडला नव्हता. तोच राजक्रांतीलाल अर्धे अंतर करून पार झालाही नव्हता तोच येवतेश्वर डोंगराच्या धावमार्गावर पडला. तातडीने त्याला मॅरेथॉनचे मेडिकल पार्टनर असलेल्या रुग्णालयात हलवले मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे काहींनी सांगितले. त्यांनंतर मृतदेह जिल्हा सरकारी दवाखान्यात हलवून शवविच्छेदन करण्यात आले. पण मृत्यूचे नक्की कारण समजू शकले नाही. खेळाडूच्या नातेवाईकांना याबाबत कळविण्यात आले आहे. मॅरेथॉन ऐन रंगात आली असतानाच ही दुर्घटना घडली. संयोजकांमध्ये बहुतेक डॉक्टर्स असल्याने सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. तातडीने राजक्रांतीलाल यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून ते सातारा जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत.

हेही वाचा : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शासनाकडे मागणी

नुकत्याच पार पडलेल्या “आपलं पुणे” या मॅरेथॉनमध्येही अशी दुर्घटना घडली होती. तेंव्हा तर जखमी व्यक्तीला अँब्युलन्सपर्यँत उचलून न्यावे लागले असल्याचा अनुभव मॅरेथॉन पटू उदय पराडकर यांनी सांगितला. सातारा हिल मॅरेथॉनमध्ये ही दुर्घटना घडल्याने बक्षीस वितरणांतर नंतर स्पर्धेवर शोककळा पसरली. मात्र देशभरातून आलेल्या धावपटूनी देशांतील सर्वात सुंदर आयोजन आणि अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये स्पर्धकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली. याच मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकवलेल्या कोल्हापूरच्या परशुराम भोई यांनी “मॅरेथॉनचे आयोजन उत्तम होते पण ही दुर्घटना व्हायला नको होती असे म्हणत हळहळ व्यक्त केली.या स्पर्धेतील दुर्घटने बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

Leave a Reply