Headlines

RRR Review : SS Rajamouli च बॉक्स ऑफिसचे ‘बाहुबली’; हे चित्रपट पाहिले नाहीत तर तुम्ही कसले सिनेरसिक

[ad_1]

मुंबई : ‘बाहुबली द बिगनिंग’ च्या तुफान यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटानं कमाईचे सर्व विक्रम मोडले. तगडी स्टारकास्ट आणि संपूर्ण टीमच्या बळावर राजामौली यांनी स्वत:चं कौशल्य सिद्ध केलं. ज्यानंतर आता त्यांचा RRR हा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

आलिया भट्ट, राम चरण, अजय देवगन आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आल्या आहेत. राजामौलींचा चित्रपट म्हणजे एक सण. अशा या सणाचा अर्थात या चित्रपटाचा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्याही आधीपासूनच बोलबाला.

इथं चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याआधीच त्यानं बाहुबलीच्या कमाईचा आकडा ओलांडल्याचं वृत्त समोर आलं.

प्री बुकींग राईट्सच्या माध्यमातून RRR नं आतापर्यंत 750 ते 800 कोटींचा गल्ला जमवला आहे. आंध्र बॉक्स ऑफिसच्या माहितीनुसार चित्रपटाला प्री थिएट्रीकल रिलीजचे 520 कोटी, उत्तर भारतात थिएट्रीकल रिलीजचे 150 कोटी रुपये, इतर भाषांमधील रिलीजचे 250 कोटी रुपये इतका गल्ला मिळाला आहे.

राजामौलींचे आणखी काही दमदार चित्रपट…

जर तुम्ही स्वत:ला खरे सिनेरसिक म्हणवत असाल तर राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेले हे चित्रपट पाहायलाच हवेत.

बाहुबली भाग 1 व 2-

जागतिक स्तरावर 1800 कोटी रुपये इतका अविश्नसनीय कमाई करणारा हा चित्रपट. जवळपास 5 मोठे पुरस्कार या चित्रपटानं आपल्या नावे केले. प्रभास, राणा डग्गुबती आणि सहकलाकारांनी या चित्रपटाला अभिनयानं चार चाँद लावले.

मक्खी-

एक लहानशी माशी, अर्थात चित्रपटाच्या नायकाचा मृत्यू होतो आणि तो माशीच्या रुपात आपल्या शत्रूच्या नाकीनऊ कसा आणतो हे या चित्रपटातून त्यांनी साकारलं आणि प्रेक्षकांना हैराण करुन सोडलं. राजामौलींचा हा चित्रपट कमाल गाजला.

मगधीरा-

ऐतिहासिक कथानकाची जोड आणि साहसी दृश्यांचा भरणा असणाऱ्या या चित्रपटानंही 150 हून अधिक कोटी रुपयांची कमाई केली होती.

विक्रमारकुडू-

ज्या रावडी राठोडची गाणी तुम्ही म्हणता तो रिमेक असून, ‘विक्रमारकुडू’ याच चित्रपटाच्या धर्तीवर साकारण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता रवी तेजा आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका होत्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *