‘RRR’ चित्रपटासाठी Jr NTR ने घेतले इतके कोटी


मुंबई : सुपरस्टार ज्युनियर एनटीआर ‘आरआरआर’ या चित्रपटातल्या भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आहे. भारतातचं नाही तर विदेशात त्याच्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. ज्युनियर एनटीआर एका चित्रपटासाठी भरमसाठ रक्कम घेतो. तसेच त्याची एकूण संपत्ती एकूण धक्काचं बसेल. (RRR superstar jr ntr net worth luxury homes cars and private jet) 

ज्युनियर एनटीआर तेलगू चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘RRR’ या चित्रपटाने तो चर्चेत आला आहे. चित्रपटातील त्याची भूमिकांना अनेकांना आवडली होती. 

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, Jr NTR दक्षिणेतील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे. एका चित्रपटासाठी तो 20 कोटी घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘RRR’ चित्रपटासाठी त्याने 45 कोटी रुपये घेतले होत. तसेच ज्युनियर एनटीआरची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे. 

आलिशान घर 
ज्युनियर एनटीआर हैदराबादच्या पॉश भागात असलेल्या जुबली हिल्समध्ये राहतो. त्यांचे हे आलिशान घर सुमारे २५ कोटींचे आहे. राम चरण, महेश बाबू, अल्लू अर्जुन यांसारखे साऊथ इंडस्ट्रीतील सर्व टॉपचे कलाकारही याच भागात राहतात. याशिवाय NTR (Jr NTR) चे बंगळुरू, कर्नाटक आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्येही त्याचे घर आहे.

लक्झरी वाहनांचा शौकीन  

ज्युनियर एनटीआरकडे रोल्स रॉयस, रेंज रोव्हर आणि ऑडी सारख्या अनेक लक्झरी कार्स आहेत. या कार्सची किंमत करोडो आहे. याशिवाय ज्युनियर एनटीआर चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड प्रमोशनमधूनही पैसे कमावतात. ते Oppo, Otto, Appy Fizz सारख्या कंपन्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते.

खाजगी जेट 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न 40 कोटी रुपये आहे. आलिशान घर आणि आलिशान वाहनांव्यतिरिक्त, ज्युनियर एनटीआरकडे एक खाजगी जेट देखील आहे ज्याची किंमत 80 कोटींपेक्षा जास्त आहे.Source link

Leave a Reply