Rohit Sharma च्या संघात No Entry! 100 कसोटी खेळणारा Team India चा ‘हा’ खेळाडू लवकरच होणार निवृत्त


Indian Cricket Team : टीम इंडियामधील स्पर्धा सातत्याने वाढत आहे. सध्या संघात प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू दावेदार आहेत. टीम इंडियाचा (team India) एक खेळाडू असाही आहे ज्याला अनेक महिन्यांपासून संघात स्थान मिळालेले नाही. टीम इंडियामध्ये या खेळाडूचे महत्त्व अचानक कमी झाले आहे. (team india fast bowler ishant sharma played his last match)

टीम इंडियाकडे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आहेत. हे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (ishant sharma) संघातून गायब झाला आहे. आता इशांत शर्माचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. इशांत शर्माने टीम इंडियासाठी (Team India) अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता. अखेरची आयपीएल (IPL 2021 ) मे 2021मध्ये खेळीली होती.

100 हून अधिक कसोटी खेळण्याचा अनुभव 

खराब फॉर्म आणि फिटनेसच्या कारणामुळं इशांत शर्माला टीम इंडियाने बेंचवर बसवले आहे. आयपीएल 2022 (ipl 2022) च्या मेगा ऑक्शनदरम्यान इशांतला कोणीच विचारलं नाही. त्यामुळे आता इशांतसाठी टीम इंडियाचे दरवजे बंद झालं आहेत. इशांतने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 93 सामने खेळले आहेत. यामध्ये 72 विकेट्स घेतल्या आहे. 12 धावांवर 5 विकेट हे त्याचे बेस्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आहे. 

इशांत शर्माच्या कारकिर्दीची उलटी गिनती आधीच ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर सुरू झाली होती. जेव्हा त्याने 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे.

मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) सारखे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत इशांत शर्माला टीम इंडियातून डच्चू मिळू शकतो.

टीम इंडियाचा आतापर्यंतचा विक्रम

इशांत शर्मा टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 311 विकेट्स आहेत. इशांतने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 115 विकेट घेण्यात यशस्वी ठरला असला तरी टी-20 क्रिकेटमध्ये इशांत शर्माला तितकेसे यश मिळाले नाही. त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माने 2016 नंतर टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. आयपीएलमध्येही त्याला संधी मिळत नाहीये. यावरून आता या खेळाडूकडे निवृत्तीचाच पर्याय उरल्याचे स्पष्ट झाले आहे.   Source link

Leave a Reply