Headlines

Rohit Sharma: …तर आयपीएल खेळणं सोडून द्यावं; रोहितच्या जवळच्या व्यक्तीचं वक्तव्य

[ad_1]

Dinesh Lad On Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आराम देण्यात आला आहे. टी-20 वर्ल्डकप 2022 (T20 World cup) मध्ये झालेल्या पराभवानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी प्रश्न केले. अशातच आता रोहितवर (Rohit sharma) अजून एक धक्कादायक विधान समोर आलं आहे. वनडे वर्ल्डकप कप 2023 च्या पार्श्वभूमीवर एका दिग्गज व्यक्तीने रोहितला आयपीएलमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला आहे. 

हा सल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर त्याचे बालपणीचे कोच दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी केलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर टीम इंडियाला 2023 चा वनडे वर्ल्डकप जिंकायचा असेल तर त्याने आयपीएलपासून दूर राहिलं पाहिजे. टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आणि त्यांचा पराभव झाला.

वर्ल्डकपच्या तयारीसाठी घ्यावा लागेल मोठा निर्णय

दिनेश लाड यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, “जर आपल्याला वर्ल्डकपची तयारी करायची असेल तर आपल्याला एकजूट व्हावं लागेल. गेल्या 7 महिन्यांमध्ये कोणीही खेळाडू ओपनिंगला येतोय-जातोय, कोणीही गोलंदाजी करतोय. त्यामुळे टीम स्थिर नाहीये. मला वाटतं की हे वर्कलोड मॅनेजमेंटमुळे होतंय. जगभरात क्रिकेट खेळलं जातंय. त्यामुळे जर वर्ल्डकप जिंकायचा असेल तर आयपीएल खेळू नका.”

हा पूर्णपणे त्याचा निर्णय असेल, मी हा निर्णय नाही घेऊ शकत, की त्याने आयपीएलमध्ये खेळलं पाहिजे की नाही. जेव्हा तुम्ही भारताकडून किंवा राज्याकडून खेळता, तेव्हाच तुमच्या नावाचा विचार आयपीएलसाठी केला जातो. तुमचा खेळच तुम्हाला आयपीएलमध्ये सॅलरी कॅप देतो, असंही लाड यांनी सांगितलंय.

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये फ्लॉप 

टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) 6 डावांमध्ये केवळ 116 रन्स करू शकला. यावेळी त्याने 19.33 च्या सरासरीने रन्स केलेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या या खराब कामगिरीनंतर त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *