Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!


India vs New zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्या खेळल्या गेलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 3-0 ने पराभव केलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंडला पाणी पाजल्यानंतर आता टीम इंडियाने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी (ICC ODI Team Ranking) पोहचली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) टीम इंडिया तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत. (ind vs nz 3rd odi match blair tickner hit ball on rohit sharma finger video viral on social media marathi sports news)

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपल्या शतकांचा दुष्काळ (Rohit Sharma Century) संपवला. रोहितने तीन वर्षांनंतर झंझावाती शतक झळकावलं आहे. रोहितने आपल्या शतकी खेळीत 6 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने 101 धावा केल्या. रोहितने वनडेमध्ये शेवटचे शतक 19 जानेवारी 2020 मध्ये ठोकलं होतं आणि त्यानंतर आज त्यानं आपले वनडेमधील 30 वं शतक झळकावलं आहे.

आणखी वाचा – ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश!

सलामीला आलेल्या कॅप्टन रोहितला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने पूर्ण जोर लगावला होता. मात्र, रोहितने संयमी खेळी करत मैदान सोडलं नाही. रोहित बाद होत नसल्याचं पाहून न्यूझीलंडने रडीचा डाव खेळण्यास सुरूवात केली.रोहित शर्मा 99 धावांवर फलंदाजी करत असताना एक घटना घडली. ज्याची चर्चा आता होताना दिसत आहे.

पाहा Video – 

रोहित शर्माला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने (Blair Tickner) ‘हिटमॅन’ला जखमी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात येतोय.  ब्लेअर टिकनरने 26 व्या ओव्हरमध्ये घातक गोलंदाजी केली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. बॉलरच्या उसळत्या चेंडूचा सामना करताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली.

दरम्यान, रोहितला दुखापत झाल्यानंतर त्याला वेदना असहाय्य झाल्या. त्याने लगेच हात झटकले. मात्र, रोहितला लागल्याचं पाहिल्यानंतर ब्लेअर टिकनर विचारपूस करण्याऐवजी हसत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे क्रिकेटवर्तुळातून ब्लेअर टिकनरवर टीका होताना दिसत आहे. तसेच व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतोय.Source link

Leave a Reply