Headlines

टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान

[ad_1]

Rohit Sharma : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलंय. बांगलादेश सिरीज (Ind vs Ban) सुरु होण्यापूर्वी टीमचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वनडे सिरीजमधून (IND Vs BAN ODI) बाहेर झाला. यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे बाहेर झाला. दुसऱ्या सामन्याअगोदर कुलदीप सेनलाही (Kuldeep Sen) दुखापत झालं असल्याचं लक्षात आलं. अशातच भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला आहे. यावेळी त्याने दुखापतग्रस्त खेळाडूंवरून चांगलंच सुनावलं आहे.

खेळाडूंचं दुखणं चिंतेचं कारण

दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी कुलदीप सेन आणि सामन्यात दीपक चाहर दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत रोहितेने कॉमेंट्रीटर अंजुम चोप्राशी बातचित केलं आहे. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, खेळाडूंना असलेल्या दुखापती या आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. ते भारतासाठी खेळतात, त्यामुळे त्यांनी 100 टक्के फीट राहणं गरजेचं आहे. मुळात त्यांनी 100 टक्क्यांहून अधिक फीट राहिलं पाहिजे.

खेळाडूंच्या फीटनेसवरून कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, दुखापत ही एक अशी गोष्ट आहे, ज्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. पूर्णपणे फीट नसलेल्या खेळाडूंचा दबाव सहन करु शकत नाहीत. देशाचं प्रतिनिधित्व करणं हे गर्वाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. अशात जर खेळाडू पूर्णपणे फीट नसतील तर त्यांनी खेळणं योग्य नाही. सततच्या दुखापतींच्या मागे काय कारण आहे, याची माहिती घेतली पाहिजे.

रोहित शर्मालाही दुखापत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. रोहित शर्मा यापुढे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

रोहितची तुफान फलंदाजी

दुसरा वनडे सामना संपला असं वाटत होतं मात्र रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर खेळायला आणि सामन्यात पुन्हा ट्विस्ट आला. मात्र रोहितने आल्यावर तुफान फटकेबाजी केली, अवघ्या 28 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. अखेरच्या षटकात 20 धावांची गरज होती. रोहितने दोन चौकार मारले, मात्र एक चेंडू वाईड गेला. भारताला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती, रोहितने सिक्स खेचत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं मात्र पुढच्या चेंडू यॉर्कर टाकत रहमानने सामना जिंकून दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *