Headlines

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला ‘…कोणीही हिटमॅन बनत नाही’

[ad_1]

Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसापासून 3 इडियट्स  सीक्केल (3 Idiots Sequel) प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे, अशी चर्चा रंगली होती.  2009 मध्ये आलेल्या 3 इडियट्स (3 Idiots) चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं. याचदरम्यान 3 इडियट्सचे तीन अभिनेते म्हणजेच आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला की, 3 इडियट्स  सीक्केल (3 Idiots Sequel) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीली येत आहे. मात्र हे तीन कलाकार चित्रपटाच्या नव्हे तर क्रिकेट अॅपच्या प्रमोशनसाठी एकत्र आल्याचे एका व्हिडीओतून स्पष्ट झाले.

अभिनयानंतर आमिर खान क्रिकेट खेळणार?

एका क्रिकेट अॅपला प्रमोट करण्यासाठी आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी एकत्र आले होते. क्रिकेट अॅपचा एक नवीन प्रमोशनल व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आमिर, माधवन आणि शर्मन पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे तिन्ही स्टार्स अशा क्रिकेटर्सची खिल्ली उडवताना दिसत आहे. ज्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

यानंतर रोहित शर्माने आमिरवर साधला निशाणा  

या क्रिकेट अॅपच्या प्रमोट व्हिडीओमध्ये आमिर खान (Aamir Khan) म्हणतो, आम्हाला वाटले की हे लोक अभिनयात व्यस्त आहेत म्हणून आम्ही क्रिकेट खेळतो. आमिरच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रीया आल्या तसेच त्याच्या  क्रिकेट खेळण्याच्या वक्तव्यावर हसतात आणि खिल्ली उडवताना दिसून आले. 

आमिर खानच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो, ‘लगान’मध्ये क्रिकेट खेळून कोणीही क्रिकेटर होत नाही. यावर आमिरला सपोर्ट करत आर माधवन म्हणतो, आमिरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण यावर रोहित म्हणतो, दोन वर्षांत एक हिट देऊन कोणीही हिटमॅन होत नाही!

हार्दिक पांड्याने स्टार्सना टोला लगावला

या तीन कलाकारांची खिल्ली उडवत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणतो- एक बाऊन्सर आला, तर तुम्ही जमिनीवर याल, त्याचवेळी जसप्रीत बुमराह कलाकारांना टोमणा मारत आहे की, मैदानावर 150 धावा तरी करू शकतील का?  जो जीता वो सिकंदर, जो हारा वो बंदर असं म्हणत अभिनेतेसुद्धा क्रिकटर्सना खुलं आव्हान देतात. दरम्यान या व्हिडीओमुळे ‘3 इडियट्स’चा सिक्वेल सध्या येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओ एका अॅपच्या प्रमोशनचा असला तरी क्रिकेटर्स आणि अभिनेते यांच्यातील ही जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *