[ad_1]
Hansal Mehta Tweet On Roger Federer Retierment: प्रसिद्ध टेनिस स्टार रॉजर फेडररने(Roger Federer) जेव्हा निवृत्तीची घोषणा केली तेव्हा जगभरातील टेनिस प्रेमी खूप दुःखी झाले. रॉजर फेडररने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना निवृत्तीची (Retirement)
माहिती दिली.त्याच्या निवृत्तीची बातमी ऐकून प्रत्येक स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या . मात्र एका मोठ्या व्यक्तीने असं काही केलं कि चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकले. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी टेनिस चॅम्पियनच्या निवृत्तीवर ट्विट केले आहे.
मात्र या ट्विटमुळे चित्रपट निर्माते ट्रोलच्या निशाण्यावर आले आहेत. खरं तर, हंसल मेहताने रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर अरबाज खानचा फोटो त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला तुझी आठवण येत राहील .”
खरी गम्मत पुढे आहे वस्त ट्विट नाही तर त्यासोबत एक फोटोसुद्धा त्यानी जोडला आणि त्यावरून चाहते जे काही भडकले आणि हंसल मेहता ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आले . (Roger Federer retirenment bollywood director hansal mehta tweet goes viral fans got angry )
हंसल मेहता यांची ही पोस्ट पाहून लोक आता लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, तुम्ही अशा व्यक्तीला मिस कराल ज्याला तुम्ही ओळखतही नाही.” तर एका यूजरने हंसल मेहता यांना विचारलेही की सर अरबाज खानला काय झाले आहे?त्यावर दुसऱ्या
युझरने उत्तर दिल , “हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे ज्ञान आहे.
Going to miss you champion. #RogerFederer. pic.twitter.com/ZNmQaNROaD
— Hansal Mehta (@mehtahansal) September 16, 2022
Dude thats not roger federer! Yahaan par bhi pirated copy?? pic.twitter.com/os21iqvOJL
— Satyan Israni (@MurgMakhaniRox) September 16, 2022
[ad_2]