रितेश म्हणजे भाडेतत्वावरचा नवरा… अभिनेत्री पत्नीचा धक्कादायक खुलासा


मुंबई : रितेश आणि त्याच्या पत्नीचे किस्से कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतात. किंबहुना ही जोडी तर चाहत्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक. कपल गोल्स वगैरे देणारी ही जोडी एका तितक्याच प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्यामुळं त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलयही कायमच असतं. मग आता, रितेशची पत्नी हे काय बोलून गेली? 

तुम्हालाही असाच प्रश्न पडतोय ना? प्रश्यांच्या या भरकटलेल्या गाडीला इथेच थांबवा. कारण, हा तुम्ही समजताय तो रितेश आणि ही तुम्ही समजताय ती त्याची पत्नी नाही. 

तर हा रितेश आहे, बहुविध कारणांनी चर्चेत असणारा अभिनेत्री राखी सावंत हिचा हा कथित पती. 

राखी सावंत (Rakhi Sawant) नं ‘बिग बॉस 15’ मध्ये रितेश आपला पती असल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिला होता. ज्यानंतर आता तिनं एक वक्तव्य ज्यानं सगळेच थक्क झाले. 

रितेशला आपला पती म्हणवणारी राखी आता म्हणे, तो माझा चांगला मित्र आहे आणि आपल्यामध्ये आता फक्त मैत्रीच असल्याचं तिने सांगितलं. 

एका मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं की, ‘बिग बॉस 15’ मधून बाहेर आल्यानंतर रितेश आणि तिचं नातं मैत्रीपुरताच मर्यादीत आहे. रितेशची बरीच प्रकरणी ही न्यायप्रविष्ठ आहेत. 

सध्या तो हा गुंता सोडवण्यावर लक्ष देत आहे. त्यामुळे मी यावर फार काही बोलू शकत नाही, असं राखी म्हणाली. 

तुम्ही आता मित्र आहात तर आधी काय होता? असा प्रश्न विचारला असता राखी म्हणाली, ‘नवरा-बायको…. सर्वांनी म्हटलं की तो माझा भाड्याचा नवरा आहे. आता भाडेतत्वाचा नवरा आहे, तर तसंच समजा. पण, आता आम्ही चांगले मित्र आहोत.’

रितेशसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करु इच्छितेस का, असं विचारलं असता राखीनं यावर शांत राहणं पसंत केलं. त्यामुळं हे नातं नेमकं कोणत्या वळणावर आहे, हे राखीच अधिक स्पष्ट सांगू शकते यावरच शिक्कामोर्तब झालं. Source link

Leave a Reply