Headlines

रितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO

[ad_1]

Genelia Dsouza and Ritesh Deshmukh: सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे. टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांना हजेरी लावली होती. पार्टीशिवाय बॉलीवूडमध्ये काहीच होत होती. नाच-गाणं, खाणं-पिणं, गप्पा-गोष्टी अशांची मोठी चंगळ सध्या सगळीकडेच पाहायला मिळते आहे. (bollywood couple genelia deshmukh and ritesh deshmukh celebrates diwali midc plot uday samant)

नुकतीच एका दिवाळी पार्टीच्या निमित्ताने जॅनेलिया आणि रितेश देशमुख (Genelia and Ritesh Deshmukh) यांनी हजेरी लावली होती. ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होतच असतात. अगदी इन्टाग्रामचं रील बनवण्याापासून ते त्यांच्या कुठल्या सेलिब्रेशनसाठी ते दोघं एकत्र असतात. 

गुरुवारी तापसी पन्नूने मुंबईत तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूजा, जॅकी भगनानीसोबत रकुल प्रीत सिंग, साकिब सलीम, श्रिया सरन तिचा पती आंद्रेई कोशिव, एली अवराम, गुरफतेह पिरजादा त्यांची बहीण मेहरीन पिरजादासोबत, प्रतीक गांधी पत्नी भामिनी ओझा यांच्यासह उपस्थित होते. (Tapasee Pannu Diwali Party)

https://www.youtube.com/watch?v=oG_hGPgncMw

मुंबईतल्या दिवाळीच्या पार्टी तापसी पन्नूने पांढऱ्या रंगाची जोडणी निवडली आणि त्याला उंच टाचांनी जोडले. दुसरीकडे, श्रिया सरन पिवळ्या लेहेंग्यात प्लंगिंग नेकलाइनसह जबरदस्त दिसत होती. श्रियाचा नवरा पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत होता. जेनेलिया डिसूझाने दोलायमान गुलाबी रंगाची साडी निवडली तर रितेशने काळ्या रंगाच्या कपड्यात तिचे कौतुक केले. रकुल प्रीत सिंह देखील तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत पार्टीत दिसली. ती लेहेंग्यात सुंदर दिसत होती तर जॅकीने लाल कुर्ता निवडला होता. 

नुकतीच जॅनेलिया आणि रितेश देशमुख कौन बनेगा करोडपतीमध्येही आला होता. (Kaun Banega Crorepati)

काय आहे नेमकं प्रकरण? – लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन रितेश आणि जॅनेलियावर आरोप केले आहेत. 2019 सालापासून लातूर एमआयडीसी भागात भूखंडासाठी 16 उद्योजकाची यादी समोर असताना त्यांच्याऐवजी रितेश-जिनिलियाच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीला एका महिन्यात भूखंड देण्यात आला तसेच कंपनीला त्याच महिन्यात 120 कोटींचं कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *