Ritesh Deshmukh च्या लेकाच्या वाढदिवसाला जमलं बॉलीवूड ; तैमूरची खास हजेरी


Ritesh Deshmukh Son Riaan Birthday: बॉलीवूडमध्ये लहान मुलांची बर्थडे पार्टी ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. बॉलीवूड सुपरस्टार रितेश देशमुखच्या मुलाचा शनिवारी दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांनी शनिवारी त्यांचा मोठा मुलगा रियानच्या आठव्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड कलाकारांना निमंत्रण दिले होते. यावेळी रियानच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांची मुलांनाही स्पेशल हजेरी लावली आहे. गिफ्ट, केक, डान्स, पार्टीचा धूम या सोहळ्यात होताच परंतु अगदी साधेपणानंही हा वाढदिवस साजरा झाला. ‘विंटर कार्निव्हल’ अशी या बर्थडे पार्टीची थीम होती अशी माहिती कळते. सैफ अली खान आणि करीना कपूरची मुले तैमूर आणि जहांगीर, ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या, शाहिद कपूरची मुलगी मीशा आणि मुलगा झैन तर आयुष्मान खुरानाची मुले विराजवीर आणि वरुष्का यावेळी उपस्थित होते. सध्या या बर्थडे पार्टीचे फोटोज सगळीकडे व्हायरल होते आहेत. (ritesh deshmukh son riaan birthday bollywood star kids attends party taimur jeh aradhya misha)

बॉलीवूड स्टार कीड्सची विशेष हजेरी 

रितेश आणि जेनेलियाने त्यांची मुले रियान आणि राहिल, त्यांच्या भाची आणि पुतण्यासोबत ‘रियान आणि राहिलचा विंटर कार्निव्हल’ लिहिलेल्या मोठ्या बॅनरसमोर पोज दिली. मुलांनी पापाराझींचे नमस्ते करून स्वागत केले. ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पार्टीत सहभागी झाली होती. ती यावेळी काळ्या ट्रॅक सूटमध्ये होती आणि तिच्या एका हातात गिफ्ट बॉक्स आणि दुसऱ्या हातात आराध्याचा हात होता.

सोहा अली खान मुलगी इनाया नौमी खेमूसोबत पार्टीसाठी पोहोचली होती. पांढर्‍या टीश आणि काळ्या पँटमध्ये दोघेही ट्विनिंग वाटतं होते. तैमूर आणि जहांगीर त्यांच्या आयासोबत पार्टीसाठी पोहोचले होते. आयुष्मानची पत्नी आणि लेखिका ताहिरा कश्यप मुलगा विराजवीर आणि मुलगी वरुष्कासोबत पार्टीत सहभागी झाली होती. पांढर्‍या रंगाच्या टॉप आणि टीजमध्ये हे तिघेही ट्विनिंग वाटतं होते.

तैमूरचही स्पेशल एन्ट्री 

आराध्या आणि ऐश्वर्या, कुटुंबासह मनीष पॉल आणि अर्पिता खान मुलांसोबत रियानच्या वाढदिवसाच्या पार्टीत आले होते. रियानच्या वाढदिवसाच्या पार्टीत मुलगा झैन आणि मुलगी मिशासोबत मीरा राजपूत, ताहिरा कश्यप मुलांसोबत आणि शरद केळकर कुटुंबासह दिसले. रियानच्या वाढदिवसाच्या पार्टीत जहांगीर, तैमूर आणि इनायाही आले होते. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतही पार्टीत दिसली. तिच्यासोबत मुलगी मीशा आणि मुलगा झैन होता. नेहा धुपिया आणि अंगद बेदी मुलगी मेहर आणि मुलगा गुरिकसोबत पार्टीत सहभागी झाले होते. पत्नी कीर्ती आणि मुलगी केशासोबत शरद केळकरही दिसले.

शब्बीर अहलुवालिया आणि त्यांची पत्नी मुलगे अझहाई आणि इवर यांनी पापाराझींसाठी पोझ दिली. एकता कपूर मुलगा रवी कपूरसोबत, मनीष पॉल मुलं सायशा आणि युवानसोबत आणि अर्पिता खान मुलगा अहिल आणि मुलगी आयत शर्मासोबत पार्टीत उपस्थित होते. 

अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. रियान 8 वर्षांचा आहे, तर राहिल 6 वर्षांची आहे. रितेश आणि जेनेलिया लवकरच ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटातून एकत्र पडद्यावर परतणार आहेत. रितेशचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या ‘वेड’ या मराठी चित्रपटातही ते एकत्र दिसणार आहेत. Source link

Leave a Reply