Rishabh Pant Birthday : उर्वशी रौतेला नाही तर ही आहे ऋषभची Queen, खुलेआम म्हणाली My Love


Rishabh Pant 25th Birthday: टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आज वाढदिवस. ऋषभ आज आपला 25 वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी (Isha negi) हिने रोमांटिक अंदाजात ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. ईशा नेगीने इन्स्टा स्टोरीवर (Insta Stories) ऋषभ पंतचेकाही फोटो शेअर केले आहेत. 

ऋषभ पंतच्या वाढदिवसानिमित्तने ईशा नेगीने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोंचा व्हिडिओ शेअर केला असून त्याखाली कॅप्शन लिहिलंय, ‘हॅप्पी बर्थ डे माय लव’

ईशा नेगी (Isha negi) ने ऋषभ पंत (Rishabh Pant) के जन्मदिन पर अपने ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट पर कुछ तस्वीरों का वीडियो बनाकर विश किया और कैप्शन में लिखा, ‘हैप्पी बर्थडे माय लव.’ ऋषभ पंत आणि ईशा नेगी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2020 च्या सुरुवातीला ऋषभ पंतने ईशा नेगीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर पंतने खुलेआम आपल्या प्रेमाची कबूली दिली होती.

ईशा नेगी देहरादूनची (Dehradun) रहाणारी आहे. ईशा उद्योजक (Entrepreneur) असून इंटीरिअर डिझायनरदेखील (Interior Designer) आहे. ईशाने देहरादूनमधल्या जीसस अँड मेरी शालेय शिक्षण तर नोएडातल्या एमिटी युनिव्हर्सिटीतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.

ईशा नेगी इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे ती नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांकडून तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळत असते.

उर्वशी रौतेलाकडून हटके शुभेच्छा
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हीने ऋषभ पंतला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण ऋषभ पंतचा बर्थडे आणि तिने शेअर केलेला व्हिडीओचं टायमिंग पाहता नेटकऱ्यांनी अंदाज बांधला आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

उर्वशी रौतेला हीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘Happy Birthday’. तसंच व्हिडीओमध्ये रेड ड्रेसमध्ये दिसत असून तिचे एक्सप्रेशन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. बर्थ डे गिफ्ट म्हणून तिने एक फ्लाईंग किसही दिला आहे.Source link

Leave a Reply