Headlines

रिंदाचा साथीदार दलप्रीत एटीएसच्या ताब्यात

[ad_1]

नांदेड : सुमारे ६ वर्षांपूर्वी नांदेडमध्ये बिच्छदरसिंग माळी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींपैकी कुख्यात गुन्हेगार रिंदा याचा साथीदार दलप्रीत दाहन या फरार आरोपीला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पंजाबमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मंगळवारी येथे मिळाली. या आरोपीस पुढील चौकशीसाठी नांदेड येथे आणण्यात येणार आहे.

२०१६ साली कुख्यात आरोपी रिंदा व त्याच्या साथीदारांनी नांदेडच्या दशमेशनगर भागात बिच्छदरसिंग माळी यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात ते जागीच मरण पावले होते. या गुन्ह्यानंतर रिंदा व त्याचे अन्य साथीदार फरार झाले होते. या हत्येप्रकरणी शहराच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर नांदेडमध्ये रिंदा आणि माळी यांच्या गटांतील वैमनस्य तीव्र होत गेले. अलीकडे व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येतही रिंदाच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. रिंदा हा आता पाकिस्तानमध्ये आश्रयाला असल्याचे सांगितले जात आहे. माळी हत्या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध महाराष्ट्र एटीएसकडून सुरू होता. त्यातील दलप्रीत दाहन हा पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका पथकाने तेथे जाऊन त्याला नांदेडमधील गुन्ह्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र नांदेडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे दिसून आले. एटीएसच्या स्थानिक अधिकाऱ्यांनाही या कारवाईविषयी कोणतीही माहिती नव्हती; पण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दलप्रीतला ताब्यात घेतल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *