Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रिचानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचानं उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’असे म्हटले आहे. (Galwan) आता या पोस्टमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रिचानं तिच्या पोस्टमध्ये तिनं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. यामुळे ती सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या निशाण्यावर होती, मात्र आता भारतीय जनता पक्षानेही तिच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी मोठी Update

रिचानं ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली होती. त्या ट्वीटवर आता भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचावर निशाणा साधला आहे. रिचानं केलेलं ट्वीट हे लाजिरवाणे असल्याचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटले आहे. रिचानं ते लवकरात लवकर डिलीट करावे, असे सिरसा यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे आपल्या सैन्याचा अपमान करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. (Actress Richa Chadha Faces Backslash Over Made fun of indian army galwan say hi tweet marathi news)

मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विटरवर स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रिचाला 3rd grade ची असल्याचे म्हटले होते. रिचाच्या या ट्विटला पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगून सिरसा यांनी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी भारतीय लष्कराचा अपमान केल्याचे म्हटले आहे. पुढे या व्हिडिओमध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचाला काँग्रेस आणि राहुल गांधी यांची पुजारी असे म्हटले आणि म्हटले की तिच्या ट्विटमध्ये तिची भारतविरोधी विचारसरणी स्पष्टपणे दिसत आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण

रिचानं नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यावर वादग्रस्त ट्विट केले होते. मंगळवारी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वक्तव्य केले की, पाकव्याप्त काश्मीर परत करण्यासारखे आदेश पार पाडण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. उपेंद्र द्विवेदींच्या या विधानाच्या व्हिडिओवर रिचानं लिहिलृं की, ‘गलवान हाय कह रहा है’. त्यामुळे आता रिचा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. Source link

Leave a Reply