Headlines

स्मशानभूमीसाठी आरक्षित जागा त्वरित मिळावी अन्यथा….

बार्शी/प्रतिनिधी – दफनभूमीसाठी आरक्षित जागा त्वरित मिळावी अन्यथा गावातील कोणी व्यक्ती मयत झाल्यास तिचा दफनविधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विधीवत करण्यात येईल. असे सूर्यकांत चिकणे व शिराज शेख यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की गुळपोळी गावातील स्मशानभूमी साठी संपादित जागेतील एक एकर जागा मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी मिळावी. गुळपोळी गावातील गट नंबर 519 हा गावातील स्मशानभूमीसाठी संपादित केलेला आहे. या गटातील एकूण जागा अडीच एकर असून त्या जागेतील एक एकर जागा ही मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी मिळावी. अन्यथा गावातील मुस्लिम समाजातील कोणतीही व्यक्ती येणाऱ्या काळात मयत झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेत त्या व्यक्तीवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

जिल्ह्याचे पालक म्हणून जिल्हाधिकारी यांनी आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा पुढील निर्माण होणाऱ्या कायदेशीर बावीस आपण जबाबदार असाल. असे सूर्यकांत चिकणे व शिराज शेख यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मौजे गुळपोळी तील खातेदार केशव सावता माळी , गट नंबर 519 असून खातेदारांना जमिनीचा मोबदला जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेला आहे. परंतु त्यांच्याकडे आदेश नाही. आदेश नसल्याने गूळपोळी ग्रामपंचायतीकडे सदर जमिनीचे हस्तांतरण झालेले नाही. तरी आम्हाला त्वरित आदेश मिळावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता. तदनंतर आम्हाला तो आदेश प्राप्त झाला असून आम्ही उपविभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडे गुळपोळी येथील 519 गटातील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेची मोजणी करुन जागा गुळपोळी ग्रामपंचायत यांच्या नावे वर्ग करण्याबाबत अर्ज केला आहे. उपविभागीय अधिकारी यांनी लवकरात लवकर मोजणी करण्याचे आश्वासन दिले आहे. – सरपंच शुभांगी अमोल नरखडे गुळपोळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *