Headlines

अवैध सावकारीची तक्रार , सहाय्यक निबंधक कार्यालयाचे छापे

बार्शी / प्रतिनिधी – गणिता गव्हाळे यांनी दाखल केलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारी अर्जाच्या व जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या आदेशावरून मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात छापेमारी करण्यात आली.

अधिक माहिती अशी की गणिता गव्हाळे यांनी निबंधक कार्यालयाकडे अवैध सावकारी विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता. तक्रारीच्या अनुषंगाने व जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या आदेशावरून सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांच्या पथकाने अशोक लंगोटे यांच्या कापड बाजार बार्शी येथील श्री ज्वेलर्स व उपळाई ठोंगे येथील राहत्या घरी पथकाने धाड टाकली. यामध्ये अनुक्रमे श्री ज्वेलर्स या दुकानी सचिन महाडिक यांच्या पथकाने व उपळाई ठोंगे येथे मनीषा गुप्ता यांच्या पथकाने धाड टाकली. या धाडी मध्ये कोरे चेक , खरेदी खते , कोऱ्या पावत्या व नोंदवह्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या दस्त नोंदी व ऐवजाची पुढील चौकशी अमोल निरडे सहाय्यक निबंधक बार्शी यांच्या मार्फत सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *