Headlines

प्रसिद्ध संगितकार काळाच्या पडद्याआड, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड आणि संगितविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कारण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित  प्रफुल्ल कार (music composer Prafulla Kar) यांच निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीवारी राहत्या घरी त्याचं निधन झालं. निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. 

ट्विट करत ते म्हणाले, ‘प्रफुल्ल कार यांच्या निधनाने प्रचंड दुःख झालं. ओडिया संस्कृती आणि संगीतात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं.  सर्जनशीलता त्यांच्या कामातून दिसून यायची . त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.’

कारने 70 हून अधिक ओडिया सिनेमांना संगीत दिले. अनेक सिनेमे, अल्बम आणि रेडिओ कार्यक्रमांना आपला आवाज दिला. ‘कमला देश राजकुमार’ या गाण्याने ते घरोघरी प्रसिद्ध झाले.

पण आज त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठी धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल कार  यांचा जन्म 1939 मध्ये झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि तीन मुले आहेत. 

प्रफुल्ल कार एक उत्तम संगीतकार, लेखक आणि स्तंभलेखक होते. कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *