Relationship बद्दल अखेर जान्हवीनं सोडलं मौन, म्हणाली, ”मी एकटी खुश आहे”


Janhavi Kapoor on Being Single: बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती रिलेशनशिप्स, डेटिंग आणि रोमान्सची. त्यात प्रेक्षकांना सर्वाधिक रस असतो तो स्टार कीड्सच्या लव्ह रिलेशनशिप्सबाबत. सध्या अशीच एक स्टारकीड तिच्या रिलेशनशिप स्टेटसवरून भलतीच चर्चेत आहे. सध्या बॉलीवूडच्या बोल्ड अँन्ड ब्यूटिफुल अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात जान्हवीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र सध्या तिची रिलेशनशिप्सबद्दलची काय मतं आहेत?, तिचे वैयक्तिक आयुष्य कसे सुरू आहे?, याबद्दल तिच्या चाहत्यांना वेगळीच उत्सुकता लागून राहिली आहे. जान्हवीच्या आयुष्यात कोणा व्यक्तीने प्रवेश केला आहे की नाही? का ती अजूनही सिंगल आहे? याबद्दल स्वतः जान्हवीनेच खुलासा केला आहे. 

सध्या जान्हवीचे रिलेशनशिप स्टेटस हे सिंगल आहे, असे तिने म्हटले आहे. ती म्हणाली, ”मी एकटी असेल तरी मी खुप खुश आहे. पण मला कधी कधी एकटेपणा जाणवतो”, अशी कबूली तिने दिली आहे. करण जोहरच्या लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये जान्हवीने आपण सिंगल असल्याचे मान्य केले. कोणाजवळ जाण्यापेक्षा शिस्तीत आपण दूर राहिलेले बरे अशी प्रतिक्रिया तिने गप्पांमधून दिली होती. 

नुकत्याच ‘द रणवीर शो’मध्ये जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना काही गोष्टींचा खुलासा केला आहे, “मी सिंगल असल्याने आनंदी आहे. कधीकधी मला एकटेपणा जाणवतो. मला कंटाळाही येतो”, असं ती म्हणाली आहे. जान्हवीला जेव्हा तिचा बॉयफ्रेंड कसा असावा यावर विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “माझ्याशी चांगलं वागणारा, मला हसवणारा असा मुलगा मला आयुष्यात हवा आहे.”

जान्हवी कपूरचे नाव शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत जोडले गेले आहे. दोघांनी ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि बोनी कपूरच्‍या प्रॉडक्‍शनच्या ‘मिली’ या चित्रपटातून दिसणार आहे. Source link

Leave a Reply