Headlines

Recover Deleted Data: लॅपटॉप मधून डिलीट झालेला डेटा ‘असा’ करा रिकव्हर, पाहा डिटेल्स

[ad_1]

नवी दिल्ली: Tips To Recover Deleted Data From Laptop: आजकाल विविध कामांसाठी सर्वच जण लॅपटॉप वापरतात. Work From Home पासून त्यांचा अधिक वापर व्हायला लागला आहे. लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये जास्त स्टोरेज असल्याने युजर्स त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि चित्रपट इत्यादी त्यात सेव्ह करतात. जेणेकरून ते सुरक्षित राहतील. पण, कधी- कधी चुकांमुळे कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरील सर्व फाईल्स डिलीट होतात. अशात, जर काही ऑफिस किंवा इतर महत्वाचा डेटा डिलीट झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल आणि तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स, चित्रपटांचे कलेक्शन किंवा फोटो डिलीट झाले असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. हा डेटा कसा रिकव्हर करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहो. यासाठी काही सोप्पी ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील.

वाचा: Mobile Networks: 1G ते 5G पर्यंतचा मोबाइल नेटवर्क आणि टेक्नोलॉजीचा रंजक प्रवास

डिस्क रिकवरी टूल्सचा वापर:

यासाठी इंटरनेटवर अनेक Tools उपलब्ध आहेत. तुम्हाला अशी अनेक डिस्क रिकव्हरी टूल्स सापडतील. ज्याच्या मदतीने तुम्ही हटवलेल्या फाइल्स डाउनलोड आणि रिकव्हर करू शकता. Disk Recovery Tools वापरण्याची पद्धत देखील भिन्न असू शकते. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, हे Tools तुम्हाला अधिकृत ठिकाणाहून डाउनलोड करावे लागेल. ते कोणत्याही पायरेटेड टूल किंवा कोणत्याही अनधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू नका.

वाचा: Charging Devices: तुमचा स्मार्टफोन १० वेळा चार्ज करू शकतात ५०००० mAh बॅटरीचे ‘हे’ मजबूत पॉवर बॅंक्स

असे केल्यास तुमच्या PC मध्ये मालवेअर किंवा कोणत्याही प्रकारचे स्पायवेअर अॅप इन्स्टॉल होण्याची शक्यता नसते . रिकव्हरी टूल डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण प्रोसेस देखील सांगितली जाते ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व डिलीट झालेल्या फाइल्स रिकव्हर करू शकता. कधी- कधी या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो.

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *