Headlines

आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांची फेरनिवड

बार्शी/प्रतिनिधी -आयटक संलग्न कर्मचारी महासंघाचे राज्य अधिवेशन गोंदिया येथे 11,12 डिसेंबर 2021 रोजी गोंदिया येथे पार पडले.या अधिवेशनामध्ये राज्याध्यक्ष म्हणून कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे तसेच कॉम्रेड नामदेव चव्हाण, बीड यांची महासचिव तर कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी यांची संघटना सचिव तसेच कार्याध्यक्ष म्हणून कॉम्रेड मिलिंद गणवीर, गोंदिया यांची निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून महासंघ कार्यकारिणीमध्ये कॉम्रेड हुआणा पुजारी, अक्कलकोट, कॉम्रेड संतोष जामदार, मंगळवेढा, सतिश गायकवाड, माढा, रशिद इनामदार, बार्शी यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.या अधिवेशनाचे उद्घाटन आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य आयटक सचिव कॉम्रेड शाम काळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम भस्मे आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहांमध्ये तसेच स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड मनोहर टाकसाळ विचार मंचावर ही सभा घेण्यात आली. तत्पूर्वी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या हस्ते अधिवेशनाचा ध्वजारोहण करण्यात आला.

राज्यभर 27 डिसेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा स्तरावर मोर्चे, धरणे तसेच 1 जानेवारी 2022 पासून मा.ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय राज्य अधिवेशनामध्ये घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *