Headlines

RCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?

[ad_1]

अहमदाबाद :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने भिडणार आहेत. (ipl 2022 qualifier 2 rr vs rcb rajasthan royals and royal challengers bangalore which team will be win match and entire final against gujrat titans) 

 या सामन्यात विजयी होणारी टीम थेट ट्रॉफीसाठी गुजरात टायटन्स (Gt) विरुद्ध दोन हात करेल. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. 

आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये एन्ट्री केली. तर राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असल्याने अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी दुसरी संधी मिळाली आहे. याआधी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता.

त्यामुळे या क्वालिफायर 2 सामन्यात दोन्ही संघात अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. आरसीबीने हा सामना जिंकल्यास आयपीएलला यंदा नवा विजेता मिळेल.

रजत-कार्तिकच्या कामगिरीवर लक्ष

एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा रजत पाटीदारने विजयी भूमिका बजावली होती. रजतने लखनऊ विरुद्ध शतक ठोकलं होतं. रजतच्या या शतकी खेळीमुळे आरसीबीला विजय मिळवता आला होता. तसेच दिनेश कार्तिकने नाबाद राहत चांगली साथ दिली होती. यामुळे आरसीबीला या दोघांकडून या निर्णायक सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार का?

साखळी फेरीच्या शेवटी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 2 संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी असतात. राजस्थानला पहिल्या संधी गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता दुसरी संधी आहे. त्यामुळे राजस्थान या दुसऱ्या संधीत आरसीबीवर ‘हल्ला बोल’ करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

राजस्थान रॉयल्स टीम :  संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, करुण नायर, ध्रुव जुरेल, आर. वेन डेर डुसेन, रवीचंद्रन अश्विन, रियान पराग, अनुनय सिंह, शुभम गढवाल, जिमी नीशाम, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेड मॅकॉय, कुलदीप सेन, तेजस बरोका, कुलदीप यादव, नॅथन कूल्टर-नाइल आणि डेरिल मिचेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, महिपाल लोमरुर, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनीश्वर गौतम, डेविड विली, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जोश हेझलवुड, जेसन बेहरनडॉर्फ, चामा मिलिंद, कर्ण शर्मा आणि सिद्धार्थ कौल. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *