RCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी”


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून मुंबईत सुरूवात होत आहे. या स्पर्धेत आरसीबीच्या कर्णधारपदी  दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसची नियुक्ती करण्यात आली. फ्रँचायझीने शनिवारी याबाबतची घोषणा केली. फ्रँचायजीने फॅफ डू प्लेसिसला नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात 2022 मध्ये 7 कोटींना विकत घेतले. कर्णधारपदी नियुक्ती होताच फॅफने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (ipl 2022 rcb new captain faf du plesis reaction after taking captaincy)

फॅफ काय म्हणाला?

“RCB सारख्या फ्रँचायझीचा कर्णधार होण्याची संधी खूप मोठी आहे. मला मिळालेली ही संधी आणि कर्णधारपदाची भूमिका स्वीकारताना फार आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये संघाला मिळालेल्या यशानंतर, मला ही भूमिका सोपवल्याबद्दल मी आरसीबी टीम मॅनेजमेंट आणि आणि कोचिंग स्टाफचा आभारी आहे. यावेळी अपेक्षित निकालांसह मी टीमसाठी सर्वस्वी प्रयत्न करेन”,असं फॅफ म्हणाला.

आरसीबीला गेल्या 14 मोसमात अनेक दिग्गज कर्णधार लाभले. मात्र त्यांना आरसीबीला विजेतेपद मिळवून देता आलं नाही. आता संघाची सर्व सूत्र ही फॅफकडे आहेत. त्यामुळे आता कॅप्टन बदलल्याने आरसीबीचं नशीब बदलणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.  

फॅफची कॅप्टन म्हणून आकडेवारी?     
 
फॅफने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत देशांतर्गत स्पर्धेत 79 टी 20 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. यामध्ये त्याने 43 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर 34 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1 सामना हा टाय तर 1 अनिर्णित राहिला. 

आरसीबीचा सातवा कर्णधार 

दरम्यान फॅफ हा आरसीबीचा सातवा कर्णधार ठरला आहे. याआधी अनेक दिग्गजांनी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे. मात्र या आधीच्या 6 जणांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही. त्यामुळे आता फॅफकडून बंगळुरुच्या चाहत्यांना अनेक अपेक्षा असणार आहेत. 

आरसीबीचे आतापर्यंतचे कर्णधार

विराट कोहली, अनिल कुंबळे, डेनिअर व्हिटोरी, राहुल द्रविड, केविन पीटरसन, शेन वॉटसन या 6 जणांनी आतापर्यंत आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.  Source link

Leave a Reply