कच्चा बादाम कोणी गायलं आहे ? चित्रपटातील गाणं आहे काय ?

यार तू तो डांस व्हिडियो पाहिलास काय ?? ते गाणं ऐकले काय ?? काय मस्त डांस आहे, काय मस्त गाणं आहे. अस वाक्य आपण हल्ली अनेक वेळा ऐकतो. हल्ली कोणती ही गोष्ट याच्या नजरेतून लपून राहत नाही. ते माध्यम आहे सोशल मीडिया. रानु मंडल (Ranu Mandal),सहदेव दिर्डो (Sahdev Dirdo) यांना सोशल मीडिया ने अवघ्या काही क्षणातच स्टार बनवले. गेल्या काही महिन्यांपासून, दिवसापासून एक गाणं खूप चर्चेत आहे. कच्चा बादाम (Kacha Badam) हे ते गाणं आहे. या गाण्यांवर आतापर्यंत अनेक व्हिडिओ बनवले गेले आहेत.युट्यूबवर शॉर्टस व्हिडिओ (youtube shorts), इन्स्टाग्रामवर रील्स (instagram reels) व्हिडीओ.यात सेलेब्रिटिंजचा ही समावेश आहे. लोकप्रिय झालेलं गाणं कोणी गायलं आहे ?? कोणत्या चित्रपटातील आहे ?? हा प्रश्न पडला असेल, बरोबर ना ?? चला तर जाणून घेऊया की लोकांच्या चर्चेत असणाऱ्या कच्चा बादाम बद्दल.

कोणी गायलं आहे कच्चा बादाम ??(Who sang the Kaccha Badam song??)

भुबन बादायकर (Bhuban Badyakar) यांनी कच्चा बादाम हे गाणं गायलयं, ते चित्रपटासाठी नाही तर भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी. भुबन बादायकर हे प्रोफेशनल गायक नसून भुईमुगाच्या शेंगा विकतात आणि ग्राहकानां आकर्षित करण्यासाठी त्यांनी ही आयडिया वापरली. म्हणजे काचा बादाम गाणं बनवलं.

बादाम ऐवजी शेंगा असण्याच कारणं ??

आता तुम्हाला वाटलं असेल की गाणं कच्चा बादाम आहे मग त्यात शेंगदाणे कसे काय? तर याच उत्तर आहे की
पश्चिम बंगाल मध्ये शेंगदाण्याला बादाम म्हटलं जातं.(In West Bengal, peanuts are called almonds)

भुबन बादायकर परिचय
भुबन बादायकर पश्चिम बंगाल मधील कुरालजुरी गावात राहतात. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असं त
त्यांचं पाच जणांचं कुटुंब आहे.

भुबन बादायकर यांची आर्थिक परिस्थिती

भुबन तुटलेल्या,जुन्या वस्तूंच्या बदल्यात शेंगा विकतात. यातून ते 200-250 रुपये कमावतात. आता गाणं वायरल झाल्याने शेंगदाण्याची विक्री वाढली आहे. परंतु आर्थिक परिस्थितीच्या बदलाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. भुबनच्या शब्दात सांगायचे तर, ‘माझ्या गाण्याबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि सरकारने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या राहण्याची काही कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना चांगले जेवण खायला द्यायचे आहे, त्यांच्यासाठी सुंदर कपड्यांची व्यवस्था करायची आहे.

सोशल मीडियात कधी काय वायरल होईल?, कोण स्टार बनेल ? सोशल मीडिया कोणाला पाडेल हे समीकरण समजणं अवघड असलं तरी सोशल मीडियाने स्टार केलेल्या भुबन बादायकर यांच जीवन सुखकर होईल ही अपेक्षा. आणखीन एक महत्त्वाची अपडेट अशी माहिती आहे की सौरव गांगुली होस्ट करत असलेल्या शो ‘दादागीरी अनलिमिटेड’ मध्ये दिसणार आहे. (Sourav Ganguly’s Dadagiri Unlimited show) ले – दिनेश शिंदे

Leave a Reply