Headlines

रविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर

[ad_1]

मुंबई : आयपीएलमध्ये जडेजानं अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खळबळ उडाली. आधीच टीमची कामगिरी अत्यंत वाईट असताना जडेजानं असा निर्णय का घेतला असा प्रश्न होता. 

मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं रविंद्र जडेजावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र जडेजानं कर्णधारपद का सोडलं याबाबत विधान केलं आहे. धोनी म्हणाला, हैदराबाद विरुद्ध आमचा स्कोअर चांगला होता. टीमने चांगली कामगिरी केली. 

‘या हंगामात तो कर्णधार असेल हे जडेजाला गेल्या मोसमातच माहीत होते. पहिल्या 2 सामन्यांमध्ये मी त्याला मदत केली, पण नंतर कर्णधार म्हणून निर्णय घेण्यास सांगितले. कर्णधार म्हणून त्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत याची त्याला पूर्ण कल्पना दिली होती.’

‘कर्णधारपदावर आल्यानंतर अपेक्षाही खूप वाढतात. त्याचा परिणाम खेळाडूच्या कामगिरीवर होत असतो. या दबावामुळे तो चांगला खेळू शकला नाही. त्याचं म्हणणं होतं की कर्णधारपद सोडून फिल्डिंग आणि खेळाकडे लक्ष देतो. तिथे सर्वश्रेष्ठ कामगिरी करेन हा त्याला विश्वास होता. त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयाचा फ्रान्चायझीने आदर केला.’ 

आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या सुरुवातीलाच धोनीने चेन्नईच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर जाडेजाकडे नेतृत्वाची सूत्रं सोपवण्यात आली. मात्र जाडेजाला आपली छाप सोडता आली नाही. जाडेजाने या मोसमातील 8 सामन्यांपैकी 2 सामन्यातच चेन्नईला विजय मिळवून दिला.

जाडेजावर नेतृत्वाची जबाबदारीचा भार असल्याने त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम झाला. त्याला विशेष असं काही करता आलं नाही. त्यामुळे जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुन्हा धोनी चेन्नईचं नेतृत्व करत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *